पाथरी(प्रतिनिधी) तालुक्यातील पोहेटाकळी/देवनान्द्रा शिवारात जायकवाडीच्या डाव्या कालव्या लागत असलेल्या मुरुमाचे तर तालुक्यातील डाकू पिंपरी येथे मातीचे उत्खनन व वाहतूक दिवसात सुरु तर रात्रीच्या वेळी मौजे गोंडगाव,गुंज,उमरा येथून वाळूचा अवैध उत्खनन वाहतूक सुरू असताना पाथरी महसूल व पोलीस प्रशासन करताय तरी काय असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडला आहे.

सविस्तर वृत्ताशकी पाथरी तालुक्यातून जाणारा जायकवाडी चा डावा कालव्यालगत असलेल्या मुरुमाची नावालाच 50 ते 100 ब्रास परवानगी घेऊन हायवा,टिप्पर च्या साह्याने दिलेल्या परवानगीच्या पाचपट मुरूम उत्खनन करून शासनाची दिशाभूल करत मोठा महसूल बुडवला जातो.तर त्याचबरोबर तालुक्यातील मौजे डाकू पिंपरी येथून नावालाच माती उत्खनन परवानगी घेऊन शेकडो ब्रास मातीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असून याकडे पाथरी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करते याकडे जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष देण्याची प्रमुख्याने गरज असल्याचे बोलले जात आहे.

         तर रात्रीच्या वेळी तालुक्यातील मौजे गोडगाव,उमरा, गुंज येथून बिनबोभाटपणे सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हायवा,टिप्पर,ट्रक,407 टेम्पो द्वारे रात्रभर शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत असून संबंधित सज्जाचे तलाठी,मंडळ अधिकारी यांच्यासह तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे काय चालू आहे हे पाहणे गरजेचे असून कलेक्टर साहेब आपण वेळीच या सर्व प्रकाराकडे लक्ष देऊन मोठी कारवाई करून या सर्व प्रकाराकडे स्वतः लक्ष देऊन कायमस्वरूपी बंदोबस्त करणार का असा सवाल सामान्य नागरिक कांकडून केल्या जात आहे.

डाकू पिंपरी येथे माती उत्खनन परवानगीसाठी माझा अहवालच दिलेला नाही-अरविंद चव्हाण तलाठी सजा

    मौजे डाकू पिंपरी येथे माती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे माहिती मिळताच आमचे प्रतिनिधी यांनी गौण खनिज विभागाशी संपर्क केला असता गौण खनिज विभागाचे कर्मचारी यांनी शंभर ब्रास मातीची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती दिली परंतु आमच्या प्रतिनिधीने संबंधित सज्जाचे तलाठी अरविंद चव्हाण यांना यासंदर्भात चौकशी केली असता या संदर्भात मला काहीही माहित नसून परवानगीसाठी माझा अहवाल लागतो परंतु माझ्याकडून आजपर्यंत तरी अहवाल मागवलेलाच नसल्याची माहिती संबंधित सज्जाचे तलाठी अरविंद चव्हाण यांनी दिली.

रात्रभर वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहने कालबाह्य झालेली आरटीओ कार्यालयाकडून कारवाईची अपेक्षा

रात्रीच्या वेळी गोंडगाव उमरा गुंज येथून वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे टिप्पर हायवा ट्रक 407 टेम्पो इत्यादी वाहनाद्वारे रात्रभर अवैध वाळूची वाहतूक बिन बोभाट पडे चालू असून सदरील वाहने कालबाह्य झालेली असून ही वाहने रोडवर धावतात कशी वाहन अधिनियमानुसार ही वाहने चालवण्यात येतात तरी कशी याकडे आरटीओ कार्यालय अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत असून सदरील वाहनांवर आरटीओ कार्यालयाकडून कारवाई होणार का हेही पाहणे औचित त्याचे ठरणार आहे