*पाथरी तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक सुरू*
*महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाची अर्थपूर्ण व्यवहारातून डोळेझाक चालू असल्याची चर्चा*
पाथरी (लक्ष्मण उजगरे)गोदावरी नदीचे पात्र मोठे असल्याने पाथरी तालुका हा परभणी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच पुन्हा गोदावरी नदी पात्रातील पाणी ओसरु लागल्याने वाळू उपसा सुरू झाला आहे याकडे मात्र पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाकडून डोळे झाक होताना दिसत आहे.
सविस्तर बातमी अशी की पाथरी तालुक्यामध्ये नाथरा ते मुद्गल असे मोठे गोदावरी पात्र असताना मागच्या वर्षी शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक उपसा झाला परंतु या अवैध वाळू उपसा करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्या प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने यावर्षी परत पावसाळा संपल्यानंतर गोदावरी नदीकाठच्या गोंडगाव उमरा येथून मागील पंधरा दिवसापासून केणीच्या व तराफ्याच्या साह्याने शेकडो ब्रास वाळू उपसा करून रात्रीच्या वेळी बिन बोभाटपणे गोंडगाव-उमरा-लोणी-बाबुलतार मार्गे पाथरी व मानवत येथे खुल्याआम कालबाह्य झालेल्या हायवा टिप्पर व ट्रकच्या साह्याने वाळूची वाहतूक चालू असताना पोलीस प्रशासन अथवा महसूल प्रशासनाकडून सदरील वाहनांवर कारवाई होताना मात्र दिसून येत नाही यामुळे नागरिकातून सदरील वाळूमाफियांकडून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनास हप्ते चालू असल्याचे बोलले जात असून त्यामुळेच रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर खुल्या अवैध वाळू उपसा करणारे वाहने चालू असताना पहावयास मिळत आहेत याकडे जिल्हा महसूल प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन सदरील अवैध वाळू उपसा अवैध वाहतूक वाहनावर ठोस कारवाई करण्याची गरज दिसून येत आहे
रस्त्यावर जागोजाग खबऱ्यांच्या टोळ्या बसलेल्या
रात्रीच्या वेळी पाथरी तालुक्यात गोंडगाव उमरा येथून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा करून कालबाह्य झालेल्या वाहनाच्या मार्फत अवैध वाहतूक चालते. या वाहनांवर कारवाई होऊ नये म्हणून प्रशासन किंवा पोलीस पथक यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हर्षवर्धन पेट्रोल पंप च्या बाजूस असलेल्या सोनपेठ फाट्यावर तुरा फाट्यावर बाबळगाव फाट्यावर आणि पोखरणी फाट्यावर वाळू माफियांचे खबऱ्यांच्या मोठमोठ्या टोळ्या गस्तीवर असतात यावरही पोलीस प्रशासनाने करडी नजर ठेवून या खबऱ्यां वर कायदेशीर रित्या कठोर कारवाई करावी अशी मागणी सामान्य जनतेतून होताना दिसू