औरंगाबाद:- (दीपक परेराव) दिनांक : १५ ऑगस्ट २०२२ रोजी अत्याचारी ब्रिटीश सत्तेला हाकलुन लावण्यासाठी मोठा व प्रदीर्घ लढा द्यावा लागला. कॉंग्रेसच्या झेंड्याखाली देश एकवटला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या कॉंग्रेस विचाराने या देशाला स्वातंञ मिळवुन दिले. या स्वातंञ लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते लोक आज हर घर तिरंगा अभियानाच्या नावाखाली इव्हेंटबाजी करत आहे. असे मत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी मंगळवार (15 ऑगस्ट) रोजी व्यक्त केले. आज औरंगाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयी गांधीभवन, शहागंज येथे ध्वजारोहण करण्यात आले. व आज औरंगाबाद शहरात वेगळा अनुभव आज कार्यकर्त्यांना बघायला मिळाला एरव्ही नेहमी व्यासपीठावर पुढारी व नेते बसलेले असतात माञ आज गावातील स्वातंञसैनिक, जेष्ठ नागरीक, व सैन्यदलातील सैनिक व्यासपीठावर बघायला मिळाले.
यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर, व युवक कॉंग्रेसचे शहरध्यक्ष सागर नागरे, मोहित जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना डॉ.कल्याण काळे म्हणाले की, केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार कॉंग्रेस सरकारने उभे केलेले देशाचे वैभव असलेल्या सार्वजनिक कंपन्या विकत आहे. अग्निपथसारखी योजना आणुन तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. किराणामाल, भाजीपाला यावर जीएसटी लावुन वेठीस धरल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जफ्फार खान, खालेद पठाण, राहुल सावंत, संजय औताडे, शामबाबा गावंडे, शिवाजी ढाकणे, हेमा पाटील, अजली वडजे, सरोज मसलगे, दीक्षा पवार, सुरेखा पानखडे बाळूशेठ गुर्जर, मोहन साळवे, पप्पू ठुबे, प्रकाश सानप, सोपान मगरी जयदेव मस्के कल्याण चव्हाण, शुभम साळवे, कैलास जाधव, प्रकाश खोतकर, भाऊसाहेब नवगिरे, अशोक डोळस, बाबासाहेब बोरचाटे, संजय जगताप, महेमूद टेलर, भारत जावळे, सत्यवान गंगावणे संतोष खरात, राजू फलके, अनिल जगताप, रवी मुळे, संदीप मनोहर, प्रवीण केदार, बाळू सोनवणे, अन्नू शिंदे, वसंत पवार, गुलाबराव भोसले, बळीराम राठोड, विजय नाडे, नानासाहेब बकाल, विष्णू तवार, सुभाष पांडभरे, सुभाष शुक्ला, चंद्र्मुनी काळे, मुसा पटेल, शेख इब्बू घासे, गुफरान काझी, दिनकर दहिहंडे, काकासाहेब दहिहंडे, रामभाऊ बनकर, दीपक खोतकर, लखन कांबळे, गणेश गवळी, संदीप खिल्लारे, राजेश काळे, ताराचंद काळे, मदन काळे, सत्तार शेख, अनिकेत काळे रोहिदास जाधव आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.