न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळा शिरुर येथील इंग्रजीचे सेवानिवृत्त शिक्षक हिंदूराव श्रीपती शिंदे वय - ८१ रा . हूडको कॉलनी शिरुर यांचे २३ संप्टेंबर रोजी वृध्दापकाळाने निधन झाले . सरांच्या जन्म सातारा जिल्ह्यातील मसूर या गावी झाला . शिंदे सर कामा निमित्त सन -१९७४ रोजी शिरुर येथील न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळेत रुजू झाले .शिरुर येथे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शहिदखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुरच्या रयत शाळेच्या पायाभरणीत व बांधकामात मोठे योगदान सरांनी दिले .बहूजन  समाजाला शिक्षित करण्याचे काम व्रत म्हणून केले . समाजशास्त्राचे शिक्षक असताना ही विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून इंग्रजी अध्यापनाचे शिवधनुष्य त्यांनी उचलले . विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम केले . कडक शिस्तीचे असले तरी विद्यार्थ्यांप्रति अंत्यत कनवाळू व संवेदनशील होते . कर्मवीर भाउराव पाटील यांनी महत्त प्रयासाने आणलेली ज्ञानगंगा शिरुर , पारनेर , श्रीगोंदा पारनेर परिसरात घरोघरी शिंदे सरांनी पोहोचवली . सामान्य घरांतील मुलांना फाडफाड इंग्रजी बोलण्यापर्यत त्यांनी त्यांच्यात बदल घडविला .त्यांनी शिकविलेल्या सिंड्रेलाचा धडा आज ही सर्व विद्यार्थ्याना जसाच्या तसा आठवतो नाट्यमय पध्द्तीने त्याचे शिकवणे सर्वांच्या समरणात आहे . सर दिवसभर शाळेत शिकविण्याचे काम केल्यानंतर रात्री रात्र अभ्यासिकेत ही थांबून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावार बारीक लक्ष ठेवत . सामान्य कुटुंबातील आपल्या आई बापाचे काबाड कष्ट लक्षात घ्या ,मुलानो उनाडपणा करु नका . शिका आपल्या आई बापाची स्वप्ने साकार करा म्हणून पोटतिडीकीने ते सांगत . सर एवढे कडक शिस्तीचे होते की सर रस्त्यावरुन येताना दिसले की मुले आपल्या क्रिकेट, विटी दांडु व गोट्यांचा खेळ अर्धवट तसाच सोडून पळून जात . एवढा धाक व दरारा सरांचा होता . सरांचे शिक्षण व माती यावर विलक्षण प्रेम . आपल्या गावाकडील शेतीवरही त्यानी जीवापाड प्रेम केले . सरांचा या कार्यात त्यांच्या पत्नी शालिनी शिंदे यांनी ही योगदान दिले . पाषाण मळा ,घावटे मळा याठिकाणी बालवाडी शिक्षीका म्हणुन त्यांनी काम केले . त्याच बरोबर खाजगी शिकवणी दवारे अनेकांचे गणित व विज्ञान सोपे करुन अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले . आठ महिन्यापूर्वी सरांच्या पत्नी शालिनी या कॅंन्सर सारख्या दुर्धर आजाराने गेल्या. पहाडा सारखे असणारे सरांचे व्यक्तिमत्व पत्नी निधनाने नाही म्हटल तरी खचून गेल . त्यातच सरांचे अर्धागवायूचे दुखण आधिक बळावल आणि सरांना सक्तीची बेडरेस्ट घ्यावी लागली . आजारपणात आई वडिलांची सेवा कशी करावी अन आई वडिलांचे आई वडिल कसे व्हावे हे सरांचे तीनही मुले प्रशांत , प्रसाद , उदय व व त्यांचे सर्व कुटुंब यांच्या कडून शिकावे . आजच्या काळातील ते श्रावण बाळ आहेत .आपल्या माता पित्याची उत्तम अशी सेवा या शिंदे कुटुंबियांनी करीत माता पित्याची सेवा कशी करावी हे दाखवून दिले . धन्य ते माता पिता अन धन्य त्यांच्या मुलांची आई वडिलांच्या प्रतिची सेवा . या तीन्ही मुलांचा सर्व स्तरात मैत्रीचा मोठा गोतावळा आहे . दररोज शेकडो जण या परिवाराचा सांत्वना करीता येत . माणंसाची व माणूसकीची श्रीमंती हे शिंदे परीवाराचे आभूषण असून ही श्रीमंती निर्माण करण्यात शिंदे सरांच्या वाट्या मोठा आहे . समाजातील अनेक कुटुंबाच्या सुख दु:ख प्रसंगी शिंदे बंधू मदतीसाठी दत्त म्हणुन हजर असतात .निरपेक्ष व निर्लेपपणे त्यांनी सर्वांशी मैत्रीभाव जपला आहे . मृदू  संधारण खात्यातील सेवानिवृत्त आधिकारी नामदेवराव घावटे त्यांच्या पत्नी अनूसया घावटे ( आत्या ) , डॉ . आर . डी .यादव , सनदी आधिकारी विजय घावटे , डॉ . विक्रम घावटे हे सदैव सावली सारखे सुख दु ;खाचा प्रसंगी शिंदे परीवाराच्या पाठीशी उभे राहीले . सरांचे थोरले चिरंजीव प्रशांत शिंदे हे व्यवसायिक व शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत . तर सरांच्या शिक्षकी पेशाचा वारसा प्रसाद शिंदे चालवत असून विद्याधाम प्रशालेतील विज्ञान विषयाचे ते शिक्षक आहेत . तर उदय शिंदे हे समस्त मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त असून समर्थ पॅथालॉजीचे प्रमुख आहेत .शिरुरच्या शैक्षणिक, सामाजिक ,धार्मिक कार्यात शिंदे कुटुंबियांचा मोठा सहभाग आहे . कर्मवीर भाउराव पाटील यांच्या विचार व आचारानुसार आचरण करणा-या शिंदे सरांच्या मृत्यु ही २३ संप्टेंबर या  कर्मवीरांच्या जयंतीच्या दिवशी झाला .सरांच्या निधनानंतर   प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल , आमदार अतुल बेनके , माजी आमदार पोपटराव गावडे  ,रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉंन्सिलचे सदस्य माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , पंतप्रधान कार्यालयातील सनदी आधिकारी डॉ .आय्याज तांबोळी , सनदी आधिकारी अमित घावटे ,  अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील , संजीव पलांडे , पोलीस उपअधीक्षक अनिल कटके , तहसिलदार डॉ . सुनील शेळके , जिल्हा परिषदे च्या माजी सदस्या जयश्रीताई पलांडे,  पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य  राहूल बाबूराव पाचर्णे , प्राचार्य फोरमचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम , आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटुन फोनद्ववारे , शोकसंदेशाद्ववारे शिंदे कुटुंबियांचे सांत्वन केले .

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |