शिरुर दिनांक ( वार्ताहर ) समाजाची गरज लक्षात घेवुन अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे . राज्यातील २ लाख वकिलांची संख्या लक्षात घेवून वकिलांना मदत करण्यारासाठी ॲडव्होकेट असिस्टंटचा कोर्स पुढील महिन्यापासून मुक्त विद्यापीठा दवारे सुरु करणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रचे कुलगुरु डॉ . संजीव सोनवणे यांनी दिली . चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर यांचा वतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरु डॉ .संजीव सोनवणे यांचे ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : शिक्षकांची भूमिका ' या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . के .सी मोहिते होते .यावेळी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य शिरीष बरमेचा , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त नाशिकच्या बोरा महाविद्यालायातील अभ्यासकेंद्राचे मार्गदर्शक प्रा .चंद्रकांत धापटे , केंद्र संयोजक डॉ .अंबादास केत , केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे , डॉ . मंदा काणे ( भालेराव ),शिरुर मुद्रक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , कल्पना बरमेचा ,योगेश लांडे , मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे , मारुती कदम आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की ज्या देशाचे शैक्षणिक धोरण चांगले असते तो देश प्रगतीचा वाटेवर पुढे असतो . शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे . धोरण राबविणारे व्यवस्थित नसतील तर धोरण फसते .विद्यार्थी शिकला की नाही हे पाहण्यासाठी शैक्षणिक धोरण आहे. शिकण हे महत्वाचे आहे .शिकणारा शिक्षणाशी निगडित करणे महत्वाचे आहे .शिकणाराच्या जीवनाशी निगडित असणारे शिक्षण असावे .नवीन धोरणात इयत्ता नसुन ८ पातळी पर्यतचा लेव्हल आहेत.विविध विषय हे एकमेकांशी निगडित आहे .त्यामुळे अनेक विषयांचे ज्ञान विद्यार्थ्याना असणे आवश्यक आहे .शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाची मूलतत्वे समजून घेतली पाहीजे .विद्यार्थ्याना चांगली भाषा व संकल्पना समजल्या पाहीजेत . आम्ही केवळ नोकर घडविणारे शिक्षक तयार करणार की व्यापार व्यवसायिक उद्योजक तयार करणार की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .समाजाला गरज असणारे अभ्यासक्रम तयार करुन विद्यार्थ्याना शिकवले पाहीजे .उद्योजकता विकास वाढीसाठी मुक्त विद्यापीठ प्रयत्न करत आहे .दरवर्षी २० ह्जार शेतक-यांना प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक देते . मधुभक्षिका पालन, मशरुम शेती , आदी बाबत प्रशिक्षण दिले जात आहे . बोरा महाविद्यालयातील अभ्यासकेंद्रावर मधुभक्षिका पालन प्रशिक्षण सुरु करावे . केवळ क्रमिक पुस्तकातील शिक्षण न देता जीवनोपयोगी कौशल्ये विद्यार्थ्याना शिक्षकांनी द्यावे . राज्यात २ लाख वकील आहेत . ॲडोव्हेकेट असिंस्टट चा कोर्स मुक्तविद्यापीठ सुरु करणार असल्याचे ते म्हणाले .संगीतातून खेळातून गणित शिकता आले पाहीजे . केवळ परीक्षेकरिताचे विद्यार्थी शिक्षकांनी घडवू नयेत . जे विद्यार्थ्याना शिकवतो ते त्याच्या जीवनाशी निगडित व्हावे हाच नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा असल्याचे ते म्हणाले . नंदकुमार निकम म्हणाले की ग आजची शिक्षणपध्दती बदलली पाहीजे . इंग्रजामुळे जुनी शिक्षण पध्दती संपुष्टात आली . नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण शिक्षकांनी समजावून घ्यावे . विद्यापीठ स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण सुरु झाले पण प्राथमिक व माध्यमिक स्तरावर अद्याप ते सुरु झालेले नाही .सूत्रबध्द पध्दतीने शिक्षणक्षेत्रात विकास होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले . यावेळी प्रास्ताविक डॉ . अंबादास केत यांनी केले. त्यात बोरा महाविद्यालयीतील अभ्यासकेंद्राची माहिती दिली . प्राचार्य डॉ . के . सी . मोहिते यांचे ही यावेळी भाषण झाले .पाहुण्याचा परिचय प्रा . सतीश धुमाळ यांनी करुन दिला . सूत्रसंचालन प्रा डॉ . क्रांती पैठणकर ( गोसावी ) यांनी केले . आभार प्रा . चंद्रकांत धापटे यांनी मानले यावेळी बोरा महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रावरील यश मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान कुलगुरु डॉ . सोनवणे यांचा हस्ते करण्यात आला .