शिरुर दिनांक ( वार्ताहर ) समाजात बदल घडविण्यासठी व लोकप्रबोधनात गणेशोत्सवाची महत्वाची भूमिका असून लोकप्रबोधन व समाजात बदल घडविण्यासाठी कार्यकर्त्यानी प्रयत्न करावेत असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले . शिरुर शहरात गणेशोत्सव  विसर्जन निमित्त   गणेश मंडळाचे कार्यकर्ते , शांतता समितीचे सदस्य , सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक पकंज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली . तहसिलदार बाळासाहेब म्हस्के , उपविभागीय पोलीस आधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , दीपरतन गायकवाड , महादेव वाघमोडे आदी यावेळी उपस्थित होते . देशमुख म्हणाले की चाब्गल्या वातावरणात व खेळीमेळीच्या वातावरणात उत्सव सण साजरा करा. समाजात बदल व लोकप्रबोधनासाठी गणेशोत्सव हा लोकोत्सव सुरु झाला असे सांगून स्वंत : ला व मंडळाला मान्य असणारी आचारसंहिता करुन उत्सव पार पाडावा असे आवाहन देशमुख यांनी केले .जबाबदार नागरिक म्हणून जबाबदारीने उत्सवात वागावे असेही देशमुख म्हणाले . तहसिलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की मागील वर्षी शांततेत गणेश विसर्जन झाले . यावर्षीही शांततेते विसर्जन करावे .प्रशासन तुमच्या सोबत आहे . ज्यांची इच्छा आहे त्यांनी गणेश मुर्ती दान करावी . उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले म्हणाले की डीजेचा व लेझरचा वापर मिरवणूकीत करु नये . डीजेचा संदर्भात तक्रार आल्यास पोलीस संबधित मंडळावर कारवाई करण्यात येईल . बैठकीत नामदेवराव घावटे , संजय बारवकर , ॲड . सुप्रिया साकोरे , अभिजीत आंबेकर ,संदिप कडेकर , शोभना पाचंगे , रवींद्र सानप , नोटरी रवींद्र खांडरे , आकाश चाकणे , उमेश शेळके , संदिप कर्डिले आदीनी या बैठकीत विविध सूचना मांडल्या . मौलाना कैसर म्हणाले की पैंगबर जयंतीनिमित्त शिरुर शहरात १६ संप्टेबर ऐवजी २० संप्टेंबरला मिरवणुक काढण्यात येईल . व डीजेचा वापर करण्यात येणार नाही . बैठकीस माजी नगराध्यक्ष नसिम खान ,लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक , नितीन थोरात , आदीसह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते . आभार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी मानले .