शिरुर दिनांक (वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदच्या वतीने गणेश मुर्ती विसर्जन घाटावर मूर्तीदान कक्षाची ही स्थापना करण्यात आली असून त्यास नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून आयपीएस आधिकारी सुप्रिया साकोरे , शिरुर वकिल संघटना गणेश मंडळ सह शिरुर नगरपरिषद सेंटर शाळेचा व अनेक नागरिकांनी गणेश मुर्ती मूर्तीदान कक्षात दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली . काळे यांनी सांगितले की गणेश शनिमंदिर विसर्जन घाट , दशक्रिया विधी घाट , रयत शाळेचे मैदानावरील कृत्रिम विसर्जन कुंभ या तीन ठिकाणी गणेश मुर्तीचे विसर्जन करणे करीता सोय करण्यात आली आहे .. पर्यावरण अनुकुल गणपती विर्सजन होणेसाठी व इतर सर्व कामासाठी नगरपरिषदे मार्फत टिमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नगरपरिषदेव्दारे विविध माध्यामाव्दारे मुर्तीदान करणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. विसर्जन स्थळी मुर्तीदान कक्षाची स्थापना करण्यात आले आहे. जे नागरिक मुर्तीदान करणार आहेत त्या नागरिकांना परिषदे मार्फत पर्यावरणदुत पुरस्काचे वाटप करण्यात येत आहे .या बाबत नागरिकांचा उस्फुर्त पणे प्रतिसाद मिळत असल्याचे काळे यांनी सांगितले .