शिरुर दिनांक ( वार्ताहर ) लोकसभा निवडणूकी नंतर शिरुर विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या ४ लाख ५५ हजार ५४० इतकी झाली आहे . विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने अंतिम मतदार यादी नूकतीच प्रसिध्द केली .लोकसभा निवडणूकीचा वेळी शिरुर विधानसभा मतदारसंघाची मतदारसंख्या ४ लाख ३९ हजार २७६ इतकी होती . लोकसभा निवडणूकी नंतर शिरुर विधानसभा मतदार संघात १६२६४ मतदार वाढले असून एकूण मतदारसंख्या ४ लाख ५५ हजार ५४० इतकी झाली आहे . जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक मतदार संख्या शिरुर विधानसभेची आहे .