शिरुर दिनांक पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरदचंद्र पवार )  पक्षाच्या महिला  सरचिटणीस  पदी सौ.सविता अनिल बोरुडे शिरूर येथील सविता अनिल बोरुडे यांची यांची निवड करण्यात आली. या संदर्भातील नियुक्तीचे पत्र  आमदार ॲड. अशोक पवार व सुजाता  पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवती प्रियंका धोत्रे, आदिशक्ती महिला मंडळ अध्यक्ष शशिकला काळे, आधार छाया फाउंडेशन सचिव प्रीती बनसोडे, रामलिंग  महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष राणीताई कर्डिले , शिरूर शहर युवती अध्यक्ष गीताराणी  आढाव आदी उपस्थित होते.