शिरुर दिनांक ( वार्ताहर ) एमआयडीसीतील कारेगाव मध्ये ११ वर्षीय स्वंत: च्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम बापास ( वय -३५ )पोलीसांनी अटक केली आहे . न्यायालयाने त्यास ३ संप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे वाशिम येथील हे कुटुंब काही वर्षापासुन कामानिमित्त रांजणगाव कारेगाव एमआयडीसीत कामाच्या निमित्ताने आले आहे . पिडित मुलीस एक भाउ असून तीची आई काही दिवसापासून वडिलाच्या बाहेरख्याली मुळे घर सोडून वेगळी राहत असून वडिल चालक म्हणून काम करतात . काही दिवसापासून संबधित पिडीतीचे वडील दुसरा एका महिले सोबत अनैतिक संबधात होते . ही महिला ही १० दिवसापूर्वी निघून गेली . संबंधित नराधम पिता काही दिवसापासून मुलीवर अत्याचार करीत होता . हा सर्व प्रकारने भेदरलेल्या पिडित मुलीने व तीच्या मुलाने वडिल करत असलेल्या अत्याचाराची माहिती फोन वरुन आपल्या आईला कळविल्या नंतर आईने हा प्रकार आपल्या कारेगाव येथील मैत्रणीस कळविला त्यानंतर ही मैत्रीण मुला मुलीस घेवून ( दिनांक २७ ऑगस्ट रोजी ) पोलीस ठाण्यात गेली . पोलीसांनी पॉस्कोचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करत नराधम पित्यास अटक केली. पिडीतेस उपचारासाठी पुणे येथील दवाखान्यात दाखल केले आहे . दरम्यान डीवायएसपी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पोलीस उपनिरीक्ष निळकंठ तिडके यांनी घटनास्थळास भेट दिली असून पीएसआय सविता काळे , अभिमान कोळेकर ,दत्ता शिंदे , विलास आंबेकर , विद्या बनकर , माधुरी झेंडगे यांच्या पथकाने तपास केला.