शिरुर दिनांक ( वार्ताहर ) एमआयडीसीत कंपनीत काम करीत असताना अंगावर जड रॉड पडून मृत्यु पावलेले कामगार शिवबाबू कमलेश शाहू वय 23 मूळ राहणार मनकापुर तालुका मजखनपूर कोसंबी उत्तर प्रदेश सध्या रा. ढोकसांगवी , पाचंगे वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्या मृत्यु प्रकरणी कंपनीचे प्रॉडक्शन चे मॅनेजर जयदेव दशरथ मांडे व बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गादास शेंडे यांचे विरुद्ध भादवि 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार सुभाषराव नवसरे यांनी फिर्याद दिली आहे . २३ जून 2024 रोजी रात्री नउच्या सुमारास रांजणगाव एमआयडीसी मधील जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर - 32/2 तालुका शिरूर जिल्हा पुणे या कंपनीमध्ये कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर जयदेव दशरथ मांडे रा. व्यंकटेश स्वप्ननगरी ,सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे व बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गाप्रसाद शेंडे सध्या राहणार - रांजणगाव ,तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी कंपनीतील कामगारांना सुरक्षिततेची साधने न पुरवठा तसेच कामगार सुरक्षिततेच्या साधनांचा वापर करता अगर कसे याची खात्री न करता कामाची पद्धत असुरक्षित असून कामगारांना जड जॉब हातानेचे प्रशिक्षण न देता सदर ठिकाणी कुशल कामगाराची नेमणूक न करता अकुशल कामगाराकडून कंपनीमध्ये काम करून घेऊन कर्तव्यावर हलगर्जी पणा निष्काळजीपणा त्यामुळे कामगार शिवबाबू कमलेश शाहू वय 23 मूळ राहणार मनकापुर तालुका मजखनपूर जिल्हा कोसंबी उत्तर प्रदेश सध्या रा. डोकसांगवी पाचंगे वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्या अंगावर जड जॉब पडून त्यात जखमी होऊन मृत्युमुखी पडला .म्हणून कंपनीचे प्रॉडक्शन् चे मॅनेजर जयदेव दशरथ मांडे व बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गादास शेंडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी आधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर तिडके करीत आहेत .