शिरूर  -पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पुणे व शिरूर तालुक्यातील निवासस्थानी ईडीने छापा टाकला .यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मंगलदास बांदल हे शिरूर तालुक्यातील राजकारणातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापतीपद भूषवलेले असून शिरूर बाजार समितीचे सभापती म्हणूनही काम केलेले आहे .यापूर्वी बांदलानी शिरूर विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे .त्यांच्या पत्नी रेखा बांदल या सुद्धा जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. त्याखेरीज लोकसभा निवडणुकीकरिता शिरूर लोकसभा मतदारसंघातून बांदल यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली होती . परंतु काही घडामोडी नंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची उमेदवारी रद्द केली होती .बांदल हे विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठांच्या भेटी गाठी घेत असतात .या भेटी मुळे ते सतत चर्चेत असतात .काही दिवसापूर्वी पुण्यातील एका बँकेच्या फसवणूक प्रकरणी ते तुरुंगात होते . सध्या ते जामिनावर तुरुंगा बाहेर आहेत . मिळालेल्या माहितीनुसार ईडीने बांदल यांच्या पुणे व शिरूर तालुक्यातील निवासस्थानावर आज सकाळी सात च्या दरम्यान छापा टाकला असून पुणे येथील निवासस्थानी स्वंत : मंगलदास बांदल असून तेथे त्याची चौकशी आधिकारी करत असून शिरुर तालुक्यातील निवासस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा मंगलदास बांदल व बांदल यांचे बंधु व कुटुंबाकडे चौकशी करण्यात येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बांदल यांच्यावर झालेली ईडीची कारवाई ही चर्चेचा विषय बनली आहे. बांदल लोकसभा निवडणुकीकरिता तीव्र इच्छुक होते लोकसभा निवडणुकी करता इच्छुक असताना व उमेदवारी पक्षाने जाहीर केल्यावर त्यांची उमेदवारी पक्षाने रद्द केली . लोकसभा निवडणुकीत हुकलेली उमेदवारीची संधी विधानसभा निवडणुकीत बांदल घेणार का याची उत्सुकता असताना त्यांच्यावर झालेली ईडीची कारवाई चर्चेचा विषय बनला आहे .