बीड (प्रतिनिधी) काही माणसं कुटुबापुरती मर्यादीत नसतात ती माणस समाजासाठी सर्वसामान्यांसाठी आपल उभ आयुष्य आर्पण करणारे असतात त्यामध्ये विनायक मेटे यांच नाव घ्याव लागेल. मेटेंनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीही स्वत:साठी काहीच मागितल नाही. मराठा समाजासाठी सर्व सामान्य आणि उपेक्षीतांसाठी ते सातत्याने मागायचे मराठा आरक्षण यासाठी त्यांन जो संघर्ष केला. तो सघर्ष आम्ही वाया जावू देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी सरकारला जे जे करता यईल ते ते करु मेटेंचे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

ते अत्यंविधी स्थळी श्रधांजली अर्पण करतांना बोलत होते. पुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले काळ सकाळी अपघाताचा माहिती मिळाली मी दवाखाण्याकडे निघालो पाठोपाठ निधनाची दुदैवी माहिती आली. मनाला चटका देणारी वेदना देणारी कालची घटना महाराष्ट्रात घडली. काही माणसे जी असता ती कुटुंबीयांपुरती मर्यादित नसतात. ती समाजासाठी उपेक्षीतांसाठी सातत्याने लढा देणारी असतात. मेटेंचा परिवार म्हणजे संर्पण मराठा परिवार आहे. त्यांच्या अनेक वेळा माझ्या भेटी झाल्या त्यांनी कधी वयक्तीक काम माघितले नाही. मराठा समाजाला जे मिळायला पाहिजे त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांचा एकच ध्यास होता. नव सरकार स्थापन झाल्यानंतर कुठल्यानही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्याव. उसतोड कामगारांचे प्रश्‍न सुटावेत. आरबी समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांच स्मारक उभारव. आण्णासाहेब पाटील महामंडळातून मराठ्यांच्या पोराचे प्रश्‍न सुटावेत यावरच ते बालायचे. मेटेंसारखा दुर्मिळ माणूस शोधून सापडणार नाही. दुसर्‍यांचे दु:ख ते आपले दु:ख माणणारा आणि मराठा समाजासाठी रस्त्यावर न्यायालयात कायम संघर्ष करणारा नेता आपल्यातून गेला. निवायक मेटेंचा संघर्ष आम्ही वाया जावू देणार नाही. काही कराव लागल ते करु मेटे देह रुपाने तुमच्या आमच्यात नसले तरी त्यांचा संघर्ष त्यांचे कार्य आल्या सोबत आहे. त्यामुळे मेटेंचे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. त्यांनी हाती घेलेले सर्व काम मार्गी लावू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री विखे पाटील, तान्हाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. श्रीकांत शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आ. भीमराव केराम, आ. संदीप क्षीरसागर, भारती लव्हेकर, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. अभिमन्यू पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, पाशा पटेल, नमिता मुंदडा, आ. श्‍वेता महाले, आ. सुमन आर. पाटील, आ. धनंजय मुंडे, खा. प्रतिम मुंडे, पंकजाताई मुंडेे, खा. जलील, आ. रत्नाकर गुट्टे, आ. बाळासाहेब आजबे, संजय दौड, अशोक पाटील, सुनिल धांडे, सुरेश नवले, राजेंद्र जगताप, जनार्धन तुपे, मात्री मंत्री खोतकर, सिराज देशमुख, माजी मंत्री, जयदत्त क्षीरसागर, पापा मोदी, आ. प्रकाश सोळंके, बदामराव पंडीत, औरंगाबाद विभागाचे पोलिस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक ठाकूर, उपविभागीय अधिकारी नामेदव टिळेकर, तहसीलदार सुहास हजारे, अधीक्षक कृषी अधिकारी जेजूरकर, कृषी अधिकारी साळवे, प्रा. मोराळे, अशोक हिंगे, अनिल जगताप, केशव आंधळे, कुडलकी खांडे, मुळकू, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, फुलचंद कराड, टी. पी मुंडे, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, पप्पू कागदे, आदी मान्यवर उपस्थित होते.