शिरुर दिनांक ( वार्ताहर )येथील सिताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात महिंद्रा प्राईड क्लासरूम यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्यवृद्धी प्रशिक्षणाची कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थिनींचे सक्षमीकरणासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत विद्यार्थिनींना नांदी फाउंडेशनचे तज्ञ प्रशिक्षक चिन्मय अभंगराव यांनी मार्गदर्शन केले . कार्यशाळेत प्रोफेशनल ग्रुमिंग, गोल सेटिंग अँड टाईम मॅनेजमेंट, प्रोफेशनल कम्युनिकेशन, डिजिटल आयडेंटिटी, क्रिटिकल थिंकिंग,ग्रुप डिस्कशन आणि प्रेझेंटेशन स्किल्स या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती यांनी केले.या कार्यशाळेचे आयोजन प्रा. प्रियांका वांजूळ यांनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, समन्वयक .शिवाजीराव पडवळ, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .