शिरुर दिनांक ( वार्ताहर ) : स्वातंत्र्यदिनानिमित्त शिरुर येथे समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन रोजी करण्यात आले होते . त्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शिरुर या शाळेचा प्रथम क्रमांक आला . भारताचा ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिरूर नगरपरिषद , डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम स्कूल, पसायदान फाउंडेशन शिरूर, आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन शिरूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन डेक्कन स्कूल, बाबुराव नगर, शिरूर येथे आयोजित करण्यात आले होते . स्पर्धेचे उदघाटन शिरुर नगरपरिषेदच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी मुख्याध्यापक व्ही .डी कुलकर्णी , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष नीलेश खाबिया , अविष्कार फाउंडेशनचे प्रा .विलास आंबेकर , सुधाकर पोटे , ओंकार संगीत विद्यालय प्रमुख गणेश मराठे , डॉ . नूतन क्षीरसागर , ,मुख्याध्यापक विनायक म्हसवडे आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना मुख्याधिकारी म्हणाल्या की लोकसाहित्य व लोकगीते हे महत्वाचे आहे, राष्ट्रप्रेमाचे बीज विद्यार्थ्यांच्या अंगी रोवण्याचा दृष्टीने देशभक्तिपर समूहगीत स्पर्धा महत्वाची आहे . आमदार ॲड . अशोक पवार यांनीही मोबाईल वरुन स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या . स्पर्धेतील बक्षिस प्राप्त शाळा पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक - पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शिरुर द्वितीय क्रमांक - बालाजी विश्व विद्यालय शिरुर तृतीय क्रमांक - न्यू इंग्लिश स्कूल शिरुर उत्तेजनार्थ बक्षिस - ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरुर , विद्याधाम प्रशाला शिरुर , .स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शंकुतला बहेनजी यांच्या हस्ते झाला . यावेळी शंकुतला बहेनजी म्हणाल्या की जीवनात चढ उतार होत असतात. त्यामुळे अपयश आले तर न खचता नवीन उमेदीने पुन्हा नवी सुरुवात करा . यावेळी स्वागत डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक डॉ समीर ओंकार यांनी केले .प्रास्ताविक प्रा . सतीश धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन जयश्री दांडगे , आभार प्रा . विलास आंबेकर यांनी मानले . स्पर्धेचे परीक्षक म्हणून गायक प्रा डॉ.केशव गाडेकर , गायिका वर्षा पंडित ,शुभांगी सुतार यांनी केले . स्पर्धेत शिरुर नगरपरिषद शाळा क्र -१ , बालाजी विश्वविद्यालय , पोद्दार इंटरनॅशनल स्कूल , विद्याधाम प्रशाला शिरुर , न्यू इंग्लिश स्कूल शिरुर ,श्री . भैरवनाथ विद्यालय पळवे खुर्द ,जिल्हा परिषद शाळा पळवे बुदृक , डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मिडियम स्कूल शिरुर , ज्ञानगंगा विश्व विद्यालय शिरुर , जिल्हा परिषद शाळा भांडगाव , या शाळांनी सहभाग घेतला .