लोकनेते बाबूराव पाचर्णे म्हणजे कार्यकर्त्यांचे आधारवड

आठवावी किती रूपे तुमची ,

अन सांगावी किती कीर्ती दातृत्वाची .

सांगू किती कार्याचा आवाका तुमच्या कार्या पुढे तुमच्या शब्द माझे बापुडे.

     पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मागील पाच दशकाहून अधिक काळ आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर अमीट छाप उमटविणारे आणि आयुष्याचा अखेरच्या श्वासा पर्यत सामान्य माणूस आणि कार्यकर्त्याच्या सुख दु;खांची काळजी वाहणारा. त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत याकरीता संघर्ष करणारा नेता म्हणजे लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे साहेब. निवडणुकीत यशा पेक्षा अपयश जास्त पदरी पडूनही खचून न जाता नव्या उमेदीने व जिद्दीने उभे राहायला शिकविणारा नेता अशी त्याची ख्याती होती. संघर्ष जणू त्याच्या पाचवीलाच पुजला होता. संघर्ष करून ही कोणतीही कटुता कोणाशीन ठेवता आपल्या कामाने आणी वागण्याने कार्यकर्त्याची व जनतेची ही मने जिंकून घेणारे लोकनेते मा. आमदार बाबुराव पाचर्णे हे नेते नाही तर लोकनेते व आपला माणूस झाले. त्यामुळेच या लोकनेत्याचा निधनानंतर केवळ पाचर्णे परिवारच नव्हे तर अनेकांना आपल्या घरातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला सारखे वाटते. पाचर्णे यांनी आयुष्यभर जो संघर्ष केला . असा संघर्ष क्क्चीतच कोण्याच्या वाटाला आला असेल . संघर्ष करताना ही कोण्याशी कटुता त्यांनी येवू दिले नाही. राजकारण आणि वैयक्तिक संबध याची त्यांनी कधी गल्लत केली नाही. राजकारणातील वैचारिक विरोध वेगळा व मैत्रीचे संबध वेगळे हे त्यानी कसोशीने पाळले. पाचर्णे साहेबांचे सर्वच पक्षांतील नेते कार्यकर्त्याशी स्नेहाचे सबंध होते. पाचर्णे साहेब यांना गप्पा व इतरांना खाऊ पिवू घालणे आदारातिथ्य करणे मनापासून आवडायचे . साहेबांच्या भोवती सदैव कार्यकर्त्याच्या गराड्या होता.या आलेल्या कार्यकर्त्यांची चहा नाश्ता पासून जेवणापर्यत बडदास्त साहेब ठेवायचे. कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्व जनतेसाठी ठेवलेली हुरडा पार्टी असो अथवा त्याच्या कृषी पर्यटना स्थळावरील आमरसाचे जेवण याठिकाणी आर्वजून सर्वांना बोलावून सर्वांचे आदरतिथ्य करणारा हा जगावेगळा नेता. सत्ता असो अथवा नसो पाचर्णे साहेब सतत जनसेवेत रमले . सत्तेने कधी ते हुरळून गेले नाही तर अपयशाने ते निराश व खचले नाही. निवडणुकीत पराभव झाल्या नंतर रडणा-या कार्यकर्त्याला समजावून सांगत निवडणुकीत हार जीत असतेच. आजचा नाही तर उद्याचा दिवस आपलाच आहे .असे सांगून कार्यकर्त्यात नवी उमेद व नवी उर्जा ते भरत. राजकारणात आमदार पाचर्णे यांना मानणारा एक स्वतंत्र मतदार होता त्याची हक्काची व्होट बँक होती. साहेबाच्या विचारा मागे ही व्होट बँक अखेर पर्यत ठामपणे उभी राहिली. आमदार पाचर्णे हे वन मन आर्मी होते. राजकारणात अत्यंत तुल्यबळ प्रतिस्पर्धी असताना साहेब सर्व सामर्थ्यानिशी व आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या जोरावर लढत राहिले. कोण आपल्याशी कस वागल ,कोणी मागे काय केल याचा विचार न करता समोर जो येईल त्याला साहेब मदत करत राहिले. कोणी आपल्याला मदत करो अथवा न करो साहेबाचा हात नेहमी देता राहिल्या . त्यामुळे अनेक धार्मिक सामाजिक कार्य असो अथवा कार्यकर्त्याचा सुख दु:खाचा प्रसंग असो या व्यक्तीने त्यांना मदतीचा हात दिला व त्याचा कोठेही डांगोरा ही पिटला नाही. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक, ते आमदार अश्या विविध ठिकाणी साहेबांनी काम केले. शिरूरच्या राजकारणात मागील पाच दशके बाबुराव पाचर्णे हे नाव तळपत होते. सन १९९५ मध्ये अवघ्या ६७८ मतांनी साहेब निवडणूक हारले. निवडणूक हारल्या नंतर ही उमेद व जिद्द साहेबांनी सोडली नाही, कार्यकर्त्याची साथ सोडली नाही. पराभवाचा दुसरा दिवशी एका कार्यकर्त्याच्या घरातील सदस्याच्या दशक्रिया विधीला साहेब उपस्थित राहिले . त्याच प्रमाणे सन २०२२ मधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी ला आजारी असताना ही साहेब प्रचारासाठी मैदानात उतरले होते असे साहेब कधीच संघर्षाला घाबरले नाही . साहेबांनी अनेकदा सत्ताधा-यांशी संघर्ष केला. फारशी सत्ता स्थाने हाती नसताना ही सत्ताधारांना अनेक निवडणूकीत घाम फोडला. विजयाचा समीप जावून अनेकदा पराभवाला सामोरे जावे लागले . अश्या वेळेस पराभवाचा प्रसंगी कार्यकर्त्यांना ‘ मै हु ना ‘ असे म्हणत त्याच्या पाठीवर ठेवलेल्या हात कार्यकर्त्याचा अंगात हत्तीचे बळ निर्माण करत .साहेबांनी सहा विधानसभा निवडणुका लढविल्या त्यात चार वेळा पराभव स्वीकारावा लागला तर दोन वेळेस विजयी झाले. आमदार म्हणून काम करताना रस्त्यांचा कामाबरोबरच मतदारसंघात विविध विकासकामे आणून त्यांनी अनेक प्रश्ने मार्गी लावली. पाचर्णे यांची प्रशासनावर असलेली पकड, नेत्याशी असलेले सौहार्दाचे संबंध व काम करण्यासाठी धडपड हे सर्व त्यांना विकासकाम करताना साह्यभूत ठरले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्याशी त्याचे जिव्हाळाचे नाते होते. त्याच बरोबर सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, मंत्री गिरीश बापट ,पंकजाताई मुंडे , मंत्री चंद्रकांत पाटील ,सदाभाऊ खोत, महादेव जानकर , माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अश्या असंख्य नेत्याशी अत्यंत स्नेहाचे सबंध होते. उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या सह अनेक मंत्री व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी पाचर्णे यांच्या आजारपणात शिरूर येथील निवासस्थानी येवून प्रकृतीची चौकशी केली होती. त्याच्या निधनानंतर अजितदादा पवार यांनी ही शिरूर येथे पाचर्णे कुटुंबीयाची भेट घेत सांत्वन केले होते. इतकेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यानी ही शोक पर पत्र पाचर्णे कुटुंबीयाना पाठविले होते. साहेब आजारी असताना त्यांना भेटण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांची रांग लागली होती. त्याच बरोबर सर्वपक्षीय नेते मंडळीचा ताफा ही येत होता. साहेबांनी आयुष्यभर काय कमावले ते या येणा-या लोकांच्या डोळ्यातून समजत होते. आमचे साहेब बरे होवू दे हा माणूस जगला पाहिजे असे अश्रू भरल्या नययांनी ते सांगत. साहेबांनी आमच्या साठी काय केले हे लोक सांगत. यावरून हा नेता एकाच वेळेस किती भूमिका पार पाडत होत्या त्यांची कल्पना येते. मित्र, कार्यकर्त्या, संघटक, नेता, मार्गदर्शक, भाऊ अशी किती तर रुपात साहेब सतत कार्यरत होते. आगामी काही दिवसा नंतर विविध निवडणुका येतील पण पाचर्णे साहेबाचा आश्वासक व हसरा चेहरा दिसणार नाही. ३० वर्षांनंतर प्रथमच विधानसभा निवडणुकीत अनेक जणांना घायाळ करणारे बाबुराव पाचर्णे नावाचे वादळ निवडणूक रिंगणात नसेल. बाबुराव नगर मधील रेस्ट हाउस वर गेल्यावर गोड हसून स्वागत करणारे आणि हक्काने चहापान करणारे साहेब आता नसतील त्याच बरोबर या परिसरात अनेक सुख दु;खाचा प्रसंगी वडीलधाराच्या नात्याने पाठीशी उभे राहणारे ,पहाडा सारखे उत्तुंग असणारे व्यक्तीमत्व नसल्याची खंत या सा-या गोष्टी साहेब आपल्यात नसल्याची जाणीव करून देणा-या आहेत. पाचर्णे जरी देहरूपाने नसले तरी त्यांनी दिलेला विचार संकटात डगमगू नका. पराभवाचा भीतीने लढण्यापासून दूर जावू नका. आपल्या जीवाभावाचे सहकारी यांना समवेत घेवून लढा. सत्ता असो नसो सामान्य माणसांचे अश्रु पुसा आणि मानवसेवा करा हा विचारांच्या जागर करणे हीच साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. साहेबांचे स्मारक तर्डोबावाडीच्या शिवतारा कृषि पर्यटनावर उभारण्यात आले आहे .आवर्जून अनेक कार्यकर्ते व नागरिक या स्मारकावर येतात व साहेबांपुढे नतमस्तक होतात . आपली सुख

दु ;ख त्यांना सांगतात आणि नतमस्तक होवून संकटाशी भिडण्याची ताकद , उर्जा घेवून जातात हे स्मारक सा-या जनतेचे प्रेरणास्थान व उर्जास्थान  अन शक्तीस्थान झाले आहे . साहेब  हयात नसतानाही त्याच्या वर जीवापाड प्रेम करणारे व  स्मारकावर आवर्जून नतमस्तक होणारे कार्यकर्ते पाहीले की साहेबांची माणूस घडविण्याची ताकद किती मोठी होती व साहेबांचे व्यक्तिमत हिमालया सारखे किती उत्तुंग होते यांची प्रचिती येते .

लोकनेते तुम्ही झिजला शिरूरच्या जनाजनांसाठी, आठवण येते तुमची क्षणाक्षणाला. कार्याचा ठेवा तुमचा सदैव आमच्यापाशी . दु;खाचा सागरात लोटून , आम्हा तुम्ही गेल्या स्वर्गलोकी . विश्वासात बसत नाही अजूनही, साहेब तुम्ही नसल्याचा . वाहतो तुम्हा आदरांजली द्वितीय स्मृतिदिनी अश्रुपूर्ण नयनांनी.