शिरुर दिनांक ( वार्ताहर ) इच्छापूर्ती श्री. साईबाबा पादुका पालखी सोहळा समिती मंडळ, ता. शिरूर, जि. पुणे यांच्या वतीने श्री.साई भंडारा सोहळाचे रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे . सकाळी ११ वा. ते दुपारी १२ वाजे पर्यत पादुका अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला असून दुपारी १२ पासू ते रात्री ९ वाजेपर्यत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . दुपारी १२ वा मध्यान्ह महाआरती करण्यात येणार आहे . दुपारी १२ वा. ते दुपारी ३वाजेपर्यत सदाशिव बाबा भजनी मंडळ राजापुर, ता. श्रीगोदा. जि.अ.नगर. व दुपारी ते ६ यावेळेत श्री साई भजनी मंडळ हे भजन सादर करण्यात येणार आहे . सायंकाळी ६ ते रात्री १० वाजे पर्यत आज कि शाम साई के नाम हा साई भक्ती संगीताचा कार्यक्रम साई सप्तसुर परिवार सांस्कृतिक मंच, वाघोली, पुणे हे सादर करणार आहेत . तर रात्री १० वाजता शेजआरती होणार आहे . हे सर्व कार्यक्रम शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात होणार असून भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन इच्छापूर्ती श्री साईबाबा पादुका पालखी सोहळा समिती, शिरुरचा वतीने करण्यात आले आहे .