75 वा स्वातंत्र्य दिन व अमृतमहोत्सवी वर्ष ठिकठिकाणी साजरा ...

बिडकिन व परिसरात हर घर तिरंगा मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभाग...

बिडकिन प्रतिनिधी:-

आज ७५ वा स्वातंत्र्य दिन व अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बिडकिन येथील पोलिस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय बिडकिन, तसेच शाळा,विद्यालये व महाविद्यालये येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.तसेच शाळा व महाविद्यालये यांच्या वतीने भव्य दिव्य प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारत माता की जय,हर घर तिरंगा,वंदे मातरम्,या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.बिडकिन येथील सर्व खाजगी व सरकारी कार्यालये येथे स्वातंत्र्य दिन व अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कर्मचारी यांची व बिडकिन व परिसरातील नागरिकांची व युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.प्रगती सेवाभावी संस्था व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने भव्य दिव्य संविधान रॅली काढण्यात आली होती.