शिरुर दिनांक ( वार्ताहर )विद्यार्थ्यांमधून उद्योजक तयार व्हावेत अशी अपेक्षा  भक्ती -शक्ती फाउंडेशनचे विश्वस्त सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले . आमदाबाद येथील पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालयात रोपवाटीकेचे उद्घघाटन संपन्न झाले.याप्रसंगी भक्ती -शक्ती फाउंडेशनचे विश्वस्त सचिन पुणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या फाउंडेशनच्या माध्यमातून सचिन पुणेकर यांच्या वतीने या रोपवाटिकेसाठी १०५००रु.निधी देण्यात आला.विद्यार्थांना शालेय जीवनापासूनच उद्योजकतेचे धडे मिळाले पाहिजेत व निसर्गावर प्रेम करायला शिकले पाहिजे हा दुहेरी उद्देश यामागे असल्याचे पुणेकर यांनी सांगितले . विद्यार्थ्यांनी मागील काही दिवसापासून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या मदतीने रोपवाटिका व्यवस्थापनाचे काम सुरू केले.यामध्ये सर्व फळझाडांच्या बिया एकत्रित करणे, शेणखत,माती व रोपवाटिकेसाठी लागणारी सर्व तयारी करण्यात आली . या कार्यक्रमाला पुणेकर यांच्यासह आमदाबाद आदर्श माजी सरपंच प्रकाशराव थोरात ,ग्रा.पं.सदस्य राजेंद्र शिंदे, केंद्रप्रमुख शांताराम पवार,शेतकरी नेते नितीन थोरात, माजी ग्रा.पं.सदस्य अविनाश सोनार, चेअरमन आबासाहेब जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन पवार, डॉ.अंकुश नरवडे, लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्वातीथोरात यांनी केले, सुत्रसंचलन रोहिदास पोटे यांनी केले तर विष्णू दासिमे सर यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोंदे सर,शिंदे सर,कोरडे मॅडम, ढेंगळे मॅडम,शरद येवले,महेश कारकुड यांनी प्रयत्न घेतले.