परळी (प्रतिनिधी)- परळी शहरातील नाथ शिक्षण संस्था अंतर्गत मिलिंद प्राथमिक विद्यालय,शिवनगर परळी वैजनाथ येथे उत्साहात 75 वा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात पार पडला.

         नाथ शिक्षण संस्था अंतर्गत मिलिंद प्राथमिक विद्यालय शिवनगर परळी वैजनाथ येथे सकाळी ८.१० वाजता ध्वजारोहण करून शिवनगर,बरकत नगर या परिसरात रॅली काढण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष आयुब भाई पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षिका पी.व्ही. देशमाने मॅडम यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार सर यांनी केले तर आभार काळे मॅडम यांनी मानले या कार्यक्रमास परिसरातील पालक व मुख्याध्यापक राठोड सर,ढोपरे सर, सरवदे सर,पवार सर,काळे मॅडम,नागरगोजे मॅडम,अन्सारी मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते