शिरुर दिनांक ( वार्ताहर ) श्री .संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठाण, शिरुर आयोजित श्री. संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी शिरुर येथे होणार असल्याची माहिती किरण बनकर यांनी दिली आहे . ३ ऑगस्टला सकाळी ६ वा. श्री संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठाण व ध्यान मंदीर व्यवस्थापन समिती, शिरुर यांच्या हस्ते महाअभिषेक ध्यान मंदिर शिरुर येथे होणार आहे . दुपारी २ ते ४ वा. : हरीभजन ( ध्यान मंदिर हरिपाठ भजनी मंडळ सादर करणार आहेत .सायं. ४ ते ५ वा. हरिपाठ व सायं. ५ वाजता महाआरती होणार असून सायं. ६ वाजता प्रसिद्ध युवा किर्तनकार ह. भ .प . प्रा . अक्षय महाराज उगले यांचे किर्तन शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालय नगर पुणे रोड येथे होणार आहे . भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री .संत शिरोमणी सावता महाराज समाज सेवा प्रतिष्ठाण, शिरुर यांनी केले आहे .