वाघोली ता. हवेली येथील विविध समस्याबाबत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार व महानगरपालिका उपायुक्त राजेंद्र मुठे यांची भेट घेतली, वाघोली येथे विविध समस्या निर्माण होत असल्याने सदर समस्या मार्गी लावण्याची मागणी यावेळी आमदार अशोक पवार यांनी केली

यामध्ये वाघोली गावाच्या ड्रेनेज लाईन प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली यामध्ये बायफ रोड ते वडजाई , फुलमळा रोड ते भावडी रोड ,काळुबाई नगर ते आव्हाळवाडी रोड ,कमलबाग ते डीकॅथलॉन ,बकोरी रोड ते केसनंद रोड ही कामे प्राधान्याने त्वरित चालू करण्याची मागणी केली

तसेच वाघोली गावामध्ये PMRDA च्या माध्यमातुन सुरु असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने चालु आहे त्याला आपल्या स्तरावरुन काम जलद गतीने होणेबाबत संबंधित विभागास सुचना व्हावेत अशी मागणी केली, ही योजना पुर्ण होई पर्यंत वाघोली गावातील ग्रामस्थांना व गृहप्रकल्प धारकांना महानगरपालिकेच्या वतीने अल्पदरात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे ही देखील मागणी करण्यात आली

 वाघोलीचा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यापासून घनकचराचे नियोजन मनपा विभागाकडुन केले जात आहे परंतु वाघोलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गृहप्रकल्पाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मनपाच्या या विभागाकडुन सुका कचरा अल्प प्रमाणात उचला जातो तर ओला कचरा गृहप्रकल्पधारकांचा उचला जात नसल्याने ग्रामस्थांनी आपल्या विभागाशी संपर्क साधला असता कर्मचारी व गाडयाची संख्या कमी प्रमाणात असल्याचे तो उचलला जात नाही. त्यामुळे वाघोली अंतर्गत रोडच्या कडेने कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. तरी आपल्या विभागाकडून वाघोलीसाठी नव्याने कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी. तसेच वाघोलीतील गृहप्रकल्पांना ओला कचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे वाघोलीतील गृहप्रकल्पांचा ओला व सुका कचरा आपल्या विभागामार्फत उचलण्याची सवलत देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली.

यावेळी हवेलीचे आमदार अशोक पवार, वाघोलीच्या  सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सुनील जाधवराव, शिवदास उबाळे, जयश्री राजेंद्र सातव, किसन महाराज जाधव,बाळासाहेब शिंदे,प्रसाद केळकर गुरमीत सिंग अदिसह मान्यवर उपस्थित होते