शिरुर दिनांक ( वार्ताहर ) : स्वातंत्र्यदिनानिमित्त शिरुर येथे समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले आहे . भारताचा ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिरूर नगरपरिषद , डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम स्कूल, पसायदान फाउंडेशन शिरूर, आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन शिरूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी डेक्कन स्कूल, बाबुराव नगर, शिरूर येथे आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेकरीता शाळेचा संघ पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे . स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे आहेत. स्पर्धेसाठी देशभक्तीपर समुह गीत सादर करता येईल, मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू किंवा कोणत्याही भारतीय भाषेमधील गीत सादर करता येईल. प्रत्येक संघांस दोन गीते सादर करावी लागतील. प्रत्येक शाळेस आपला एकच संघ पाठवता येईल. संघातील गायक विद्यार्थ्यांची संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 12 असावी. सदर विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीत शिकणारे असावेत. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश परिधान करावा. वादक हे शाळेतील विद्यार्थी अथवा शिक्षक असावेत. वादक नसलेल्या शाळांसाठी हार्मोनियम व तबला यांची साथ संगत उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय संघास चषक प्रदान करण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणाऱ्या दोन संघास सन्मानित करण्यात येईल. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक संघास सादरीकरणास एकूण 10 मिनिटाचा अवधी मिळेल. परीक्षण करताना गीताची निवड, शब्दोच्चार, सूर व ताल, सामूहिक शिस्त व परिणामकारकता आदी मुद्द्यांचा विचार केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत डेक्कन स्कूल, बाबुराव नगर, शिरूर येथे घेण्यात येईल. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी 4:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडेल. सहभागी शाळांना त्यांचे टाईम स्लॉट आदल्या दिवशी कळविण्यात येतील. सहभागी संघांची संख्या जास्त असल्यास स्पर्धा सोमवार १२ ऑगस्ट व मंगळवार १३ ऑगस्ट अशी दोन दिवस घेण्यात येईल. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी आपल्या संघातील सहभागी विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापकांच्या सहिनिशी गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत डेक्कन स्कूलच्या कार्यालयात जमा करावी. अधिक माहितीसाठी डॉ समीर ओंकार 9822790307, प्रा. सतीश धुमाळ 9028301400 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .