शिरुर दिनांक - गणेगाव खालसा , ता शिरुर येथील ओढ्‌यातील पाण्यामध्ये केमीकल सोडणा-या आरोपीचा पोलीसांनी छडा लावून आरोपीस अटक करुन केमीकलचा टॅकर ताब्यात घेण्यात आला आहे .किशोर दशरथ मोरे वय 36 वर्ष धंदा ड्रायव्हर रा. बेकराईनगर हडपसर ता. हवेली जि.पुणे असे त्याचे नाव आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.11 जुलै 2024 रोजीचे रात्री गणेगाव खालसा गावचे हद्दीतील कामीनी ओढ्‌यामध्ये अज्ञात इसमाने विषारी केमीकल सोडल्याने ओढ्‌यातील पाणी दुषित झाले होते. त्या केमीकलमुळे पाण्यचा रंग लालसर होवुन सदर पाण्यामुळे मानवी व प्राण्याचे जिवीतास धोका निर्माण झालेला होता. सदरचे केमीकल युक्त पाणी कामीनी ओढ्‌यातुन पुढे कोंढापुरी येथील तळ्याला मिळत असल्याने व कोंढापुरी तलावातील पाणी आजुबाजुच्या गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पुरवठा होत असल्याने सदर प्रकरणांची पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. सदर घटनास्थळास प्रांतअधिकारी स्नेहा किसवे - देवकाते उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर प्रशांत ढोले , तहसिलदार बाळासाहेब म्हस्के , पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट देवुन पाहणी करुन सदरचे पाणी कोंढापुरी तलावामध्ये जाऊ नये यासाठीच्या उपाय-योजना केल्या होत्या. गणेगाव खालसा गावचे ग्रामसेवक श्रीकांत सुखदेव वाव्हळ यांचे फिर्यादीवरुन दि. 12 जुलै 2024 रोजी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . सदरच्या दुषित पाण्यामुळे ओढ्‌यातील वनस्पती करपटुन, मासे मरण पावले होते त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधिक्षक पुणे पकंज देशमुख यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन प्रभावी कायदेशिर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यानी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी दोन वेगवेगळी तपास पथके तयार केली होती. गोपनिय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी किशोर दशरथ मोरे वय 36 वर्ष धंदा ड्रायव्हर रा. बेकराईनगर हडपसर ता. हवेली जि.पुणे हा पुणे रेल्वस्टेशन येथुन परराज्यात पळुन जाण्याचे तयारीमध्ये असतांना त्यास तपास पथकाने ताब्यात घेवुन अटक केली. सदर गुन्हयाचे तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, "यातील अटक आरोपी किशोर दशरथ मोरे याने त्याच्याकडील टॅकर क्र. MH 04 एचडे 4530 यामध्ये रांजणगाव एमआयडीसी मधील नामांकित कंपनी मधुन दि. 09/07/2024 रोजी 35 टन हायड्रोक्लोरीक ॲसिड भरुन ते सुखा केमीकल कंपनी, बडोदरा, गुजरात येथे खाली करण्यासाठी भरले होते." परंतु यातील आरोपी याने सदरचे केमीकल हे संबधित कंपनीमध्ये खाली न करता गणेगावचे हद्दीतील कामिनी ओढ्‌यातील पाण्यामध्ये सोडुन दिले आहे. व सदरचे ॲसिड हे सुखा केमीकल कंपनीमध्ये जमा केल्याची बनावट पावती तयार करुन संबंधित कंपनीस पाठविली होती. त्यानुसार सदर दाखल गुन्ह्यामध्ये बनावटी करणाचे वाढीव कलमांचा अंतर्भाव करण्यात आला असुन सदर गुन्ह्यामध्ये आणखी इतर कोणाचा सहभाग आहे काय, यापूर्वी असा प्रकार कोठे केला आहे काय याबाबत पुढील अधिक तपास चालु आहे. हा तपास पोलीस अधीक्षक पकंज देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीसअधिकारी शिरुर प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो. हवा. विलास आंबेकर, पो.हवा. ब्रम्हा पोवार, पो.हवा. संदिप जगदाळे यांनी केला . सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडेके हे करत आहेत.