शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आषाढी एकादशी निमित्त व्हिजन इंटर नॅशनल स्कूल शिरुर येथे  पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी शाळेचे चेअरमन विकास पोखरणा, मुख्याध्यापक पसक्वीन कासी,प्रशासक शितल बांदल,शिक्षक आणि इयत्ता दुसरीचे पी.टी.ए‌. मेंबर्स सौ.प्रियंका राजपूत ,श्री.व सौ.कर्नावट,सौ.भाग्यश्री गांधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, पालखी पूजन व विठ्ठलाची आरती झाली.         वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक , रिंगण आणि विठू नामाचा गजराने व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, शिरूर शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता . आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरात दिंडी काढली. काही मुले विठ्ठल रखुमाई,वारकरी बनली होती. यावेळी ज्ञानोबा माऊली  ,तुकाराम च्या जयघोषाने शाळेचा सारा परिसर वारीमय झाला होता . बाळगोपाळांनी नृत्य, पसायदान, आणि भक्ती गीत सादर केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी  पुर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका शोभा मिडगुले, तुषार सर,शुभम सर, आनंद सर, रविराज सर,पवन सर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल मुळे यांनी केले.