औरंगाबाद:- दि.१४ (दीपक परेराव)देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर च्या वतीने भव्य तिरंगा वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तसेच माजी आमदार स्व.विनायक मेटे यांना भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली.पुढे ही रॅली छत्रपती संभाजी महाराज यांना टिव्ही सेंटर चौक येथे अभिवादन करून समारोप झाला.याप्रसंगी...केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.ना.भागवत कराड महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.अतुल सावे यांच्या सह प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सर्व प्रकोष्ठ आघाड्याचे पदाधिकारी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.