शिरुर दिनांक ( वार्ताहर) - साई बाबा की जय , ओम साईराम च्या जयघोषात शिरुर येथील सतरा कमानीच्या पुलाजवळ साईबाबा पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा पार पडला . मोठ्या संख्येने साईभक्त यावेळी उपस्थित होते .रिंगण सोहळानंतर पालखी सोहळ्याने सतरा कमानीचा पूल ओलांडून पुणे जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला . तत्पूर्वी सायंकाळी शिरुर शहरातून जाणा-या पुणे -अहमदनगर महामार्गाने साईबाबा पालखी सोहळ्याने शिरुर शहरात प्रवेश केला. यावेळी ठिकठिकाणी गुलाबपुष्पांच्या पायघड्या, साईनामाचा गजर केला गेला .पुणे नगर रस्त्यावर प्रीतम प्रकाश नगर व मंगलमुर्तीनगर , पवार मळा जवळ पालखी सोहळ्याचा स्वागता करीता स्वागत कमानी उभारुन सजावट करण्यात आली होती .त्याच बरोबर खाद्यपदार्थ, फळे , पाणी बॉटल , आदीचे ही वारक-यांना वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा पाबळ फाटा, शिरुर बसस्थानक , जुने नगरपरिषद कार्यालय , विद्याधाम प्रशाला मार्गे साई मंगल गार्डन येथे मुक्कामासाठी विसावला .त्याठिकाणी स्वागत व महाप्रसादाची व्यवस्था विजय साखला परीवाराचा वतीने करण्यात आली होती . साईबाबांची आरती व दर्शनासाठी साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती . आज सकाळी पालखी सोहळ्या पुणे नगर रस्त्यावरुन शिरुर तहसिल कार्यालयासमोरुन जोशीवाडी कडे मार्गस्थ झाला . पुणे नगर महामार्गावरील घोडनदीवरील सतरा कमामीचा पुलाजवळ पालखी सोहळा पोहचल्यावर नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडला . रिंगण सोहळाच्या ठिकाणी आकर्षक अश्या रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. साईनामाचा गजर करीत मोठ्या उत्सहात रिंगण सोहळा पार पडला . मानाच्या अश्वाने प्रदक्षिणा घालत गोल रिंगण पूर्ण केले . रिंगण सोहळा पार पडल्यावर साई भक्तांनी फुगड्यांच्या फेर धरला व साई भक्तीच्या गाण्यांवर ठेका धरत नृत्य ही केले . याठिकाणी साई भक्तांना हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा वतीने नाष्टाचे वाटप करण्यात आले . यावेळी मंदार शहाणे, महावीर क्षीरसागर , रमेश भोसले , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद लांडे , माजी उपसरपंच गणेश खोले ,शरद परदेशी, रणजीत गायकवाड , श्याम परदेशी , अशोक काळे ,महेंद्र ढेरे , फिरोज शिकलकर , प्रणव मुसळे , प्रीतेश फुलडहाळे ,सुधाकर ओतारी , गोपीनाथ पठारे , ॲड . सुप्रिया साकोरे ,सुदाम चव्हाण , आदीसह मोठ्या संख्येने शिरुरकर उपस्थित होते . अनेक शिरुरकर गव्हाणेवाडी पर्यत पालखी सोहळास निरोप देण्याकरीता पायी गेले .साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त साई पालखीचे आयोजन करण्यात येते. यंदा पालखी सोहळ्याचे ३६ वे वर्ष आहे .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

फोटो ओळी - साईबाबा पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण सतरा कमानीचा पुलाजवळ झाले. रिंगण सोहळानंतर पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला .