औरंगाबाद शैलेंद्र खैरमोडे 

औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील 55 चोरी गेलेला मुद्देमाल यामध्ये स्त्रीधन( सोन्या, चांदीचे दागिने), रोख रक्कम, वाहने, मोबाईल, असा एकुण 51,33,638 /- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जिल्हा पोलासांना यश मिळाले आहे. हा हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल यातील फिर्यादीना तातडीने मिळावा याकरिता मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, व मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक यांनी संपुर्ण कायदेशिर प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्याचे सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.

 या अनुषंगाने आज दिनांक 13/8/2022 रोजी सकाळी 11:30 वाजेला मा. मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक यांनी स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्याने कैलासशिल्प सभागृह, येथे आयोजित समारंभात महिला व नागरिकांना त्यांची चोरी गेलेले वाहने, दागिने, रोख रक्कम, मोबाईल, असा  एकुण 51,33,638/- रूपयांचा मुद्देमाल मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे हस्ते परत करण्यात आला आहे.

दागिण्याशी महिलांचे भावनिक नाते जुळलेले असते त्यामुळे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षात दागिने परत मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगूणीत झाल्याचे याप्रसंगी सांगत त्यांचे डोळयात आनंदश्रु तरळले होते. तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी दुचाकी व चारचाकी वाहने, मोबाईल फोन, इ. साहित्य परत मिळाल्याने मुळ मालकांनी भावनिक होत मा. पोलीस अधीक्षक यांनी स्वातंत्र्याचे अमृत मोहत्सवी वर्षाची अनोखी भेट दिल्याची भावना व्यक्त केली आहे.

 या कार्यक्रम प्रसंगी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, यांचेसह डॉ विशाल नेहुल, जयदत्त भवर, मुकुंद आधाव, विजयकुमार मराठे, प्रकाश बेले, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,  प्रकाश चौगुले, उपअधीक्षक (गृह) यांचेसह 100 ते 150 नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन स.पो.नि. भरत मोरे यांनी केले आहे.