शिरुर दिनांक- शहरातील प्रसिध्द खते व बी बियाण्याचे विक्रेते व महाराष्ट्र फर्टिलायझर संघटनेचे सदस्य दिलीप वसंतलाल कोठारी ( कान्हूरवाला) वय -६० यांचे ह्रदयविकाराचा झटक्याने निधन झाले . त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोठारी यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगी ,आई ,पुतणे असा परीवार आहे . शहरातील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता . प्रसिध्द उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल ,रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉंन्सिल सदस्य जाकिरखान पठाण , जैन संघटनेचे कांतीलाल बोथरा , सुनील बाफना , शरदचंद्र पतसंस्थेचे विलास गोसावी , राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे भाउसाहेब बेंद्रे , बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले , बाजार समितीचे माजी सदस्य बंडू जाधव , व्यापारी महासंघाचे विनय संघवी , माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल  , राहूल बोथरा  ,कपिल बोरा , सचिन कातोरे ,यांचासह अहमदनगर ,  ,छत्रपती संभाजीनगर , पुणे ,जालना येथील जैन बांधव उपस्थित होते .