शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर बसस्थानकातील बेकायदेशीर  बांधकाम थांबवावे अशी मागणी मनसेचा वतीने शिरुर नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे .यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की  शिरूर बसस्थानकामधील बेकायदेशीररित्या कोणतीही परवानगी न घेता इमारत उभी करुन पंप उभारण्यात येत आहे .सदर ठिकाणी उभारण्यात आलेल्या इमारतीची व पंपाची पाहणी पाहणी करून बेकायदेशीर रित्या उभारलेल्या गोष्टी निष्काशीत करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा या विरूद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शिरूर नगरपरिषदेची राहील असा इशारा निवेदनादवारे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे व मनसेचे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी दिला आहे.