शिरुर दिनांक ( वार्ताहर )चैतन्य सद्‌गुरू योगीराज श्री शंकर महाराज समाधी दिनानिमित्त बुधवार दि. १५ मे २०२४ रोजी तिळवण तेली समाज मारुती मंदिर ,मुंबई बाजार ,शिरुर येथे धार्मिक कार्यक्रम , भक्ति संगीत व महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रितेश गादिया यांनी दिली आहे . 

गादिया यांनी सांगितले की सालाबादप्रमाणे चैतन्य सद्‌गुरु ब्रह्मांड नायक श्री शंकर महाराज यांचा समाधी दिनानिमित्त बुधवार दि. १५ मे २०२४ रोजी शिरुर रोजी सायं. ५.०० वा. स्वरसमर्थ अभंगवाणी भक्ति मंडळ पुणे यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होईल . सायं. ७.०० वा.श्रीं चे पोथी वाचन प्रदीप गादिया करतील . त्यानंतर श्रीं ची आरती व महाप्रसाद होईल . या कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गादिया यांनी केले आहे .