शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचाराकरीता महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी रॅली द्वारे शिरुर येथे मतदारांशी संपर्क साधला 

 . रॅलीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सूरज चव्हाण , माजी आमदार रमेश थोरात , राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार ,भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे , शिवसेनेचे शहराध्यक्ष मयूर थोरात ,आरपीआय(आठवले ) शहराध्यक्ष नीलेश जाधव , शृतिका झांबरे , संतोष शितोळे ,वर्षा काळे ,विजय नरके , टिकू ओस्तवाल ,माजी नगरसेवक विनोद भालेराव , अविनाश जाधव आदी उपस्थित होते . शिवाजीराव आढळराव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन तटकरे  यांनी केले आहे .