शिरुर दिनांक ( वार्ताहर ) सत्ता आवश्यक असते असे नाही सत्ता नसताना ही जागरुक पणे काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व माजी केंद्रिय मंत्री शरद पवार शिरुर येथे म्हणाले . शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार खासदार डॉ . अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर मधील कापड बाजारात माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , माजी गृहमंत्री अनिल देशमुख ,माजी मंत्री राजेश टोपे , खासदार डॉ. अमोल कोल्हे , आमदार ॲड .अशोक पवार , उत्तम जानकर , माजी आमदार काकासाहेब पलांडे ,जगन्नाथ शेवाळे , अंकुश काकडे , सुजाता पवार आदी उपस्थित होते . पवार म्हणाले की काही जण सांगतात लोकसभेत जायचे आहे .नुसते जावून काय उपयोग निधी आणावा लागतो . आपण गेल्या ५६ वर्षापासून विविध सभागृहात लोकप्रतिनिधी आहे.त्यात २० ते २२ वर्ष मंत्री म्हणून काम केले व इतर काळावधीत लोकप्रतिनिधी म्हणून काम केले .परंतु मंत्री नाही म्हणून कामे झाली नाहीत असे नाही .नुसते भाषणे करुन उपयोग नाही , निधी आणण्यासाठी सत्तेत जावे लागते असे काही जण म्हणतात .पण चांगले काम करणारा व जागरुक लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटत असतात असे ते म्हणाले . बदलत्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना पवार म्हणाले की पुणे जिल्ह्यात जुन्नर , आंबेगाव ,खेड व शिरुर मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार होते .त्यापैकी तीन आमदारांनी आपल्या वाटा बदलल्या पण शिरुरच्या आमदारांनी वाट बदलली नाही . भविष्यात काही देण्याची वेळ आली तर शिरुरला मोकळे ठेवणार नाही असे आवर्जून पवार यांनी सांगितले . संसदेत लोकप्रतिनिधी म्हणुन सर्व घटकांची प्रभावी बाजू खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे मांडत असतात असे सांगून कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले . माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की सध्या सामान्य माणूस, छोटे व्यवसायिक भरडले गेले आहेत. .चूकीचा पध्दतीने कर आकारणी केली जात आहे . महाराष्ट्रात मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे खासदार उमेदवार निवडून येणार आहे . जनतेने निवडणूक हातात घेतली आहे . आमदार रोहित पवार म्हणाले की शरद पवार यांची तब्येत बरी नाही .त्याना विश्रांतीची विनंती आम्ही केली पण ते स्वंत :चा विचार न करता महाराष्ट्राच्या विचार करत विचारांच्या लढाईसाठी बाहेर पडले आहेत . डॉ .अमोल कोल्हे शिरुर मधून तीन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . सामान्याच्या साठी नाही तर मित्रांच्या व स्वंत :चा विकासासाठी पक्ष सोडुन गेल्याची टीका त्यांनी केली . भाजपा २०० च्या पुढे जागा जिंकणार नाही . राज्यात ३५ जागा महाविकास आघाडीचा निवडून येतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला . शिरुरचे उमेदवार खासदार डॉ . अमोल कोल्हे म्हणाले की भाजपाने कांदा उत्पादकांना फसवले आहे . मी समोरच्या उमेदवारावर जे आरोप केले ते खरे होते .एका सहकारी पतसंस्थेतील एका शिपायाला ९५ लाखाचे कर्ज दिले आहे .ही ठेवीदारांशी गद्दारी नाही का असा प्रश्न त्यांनी विरोधक उमेदवारांना केला . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात मी त्यांना राजिनामा देतो असे म्हणालो मी असे कधी जाहीरपणे म्हणालो नाही .पण तुम्ही भावनिक होवून राजिनामा देवून शेती करायला जातो असे म्हणाले होते त्याचे काय . शेतक-याचा मुलाला पाडण्या पेक्षा बिबट्या प्रवण क्षेत्रात दिवसा शेतीला पाणी द्या .त्याच बरोबर बिबट्या प्रवण क्षेत्रातील बिबट्याचा उपद्रवाचा संदर्भात मार्ग काढावा असे ते म्हणाले . आमदार ॲड .अशोक पवार म्हणाले की आम्ही निष्ठेने शरद पवार यांचा पाठीशी उभे राहिलो . दुधाच्या व कांदाचा प्रश्नावर समोरचा उमेदवार् काही बोलतो का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .