भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी (दि.12) तिरंगा ध्वजाचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन कुलकर्णी, अभियान संयोजक माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, सहसंयोजक संजय रिझवानी, माजी नगरसेविका मंगल मुदगलकर, माजी नगरसेवक मोकिंद खिल्लारे, मंडळाध्यक्ष सुनील देशमुख, भिमराव वायवळ, सुहास डहाळे, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, प्रशांत सांगळे, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतीक पटेल, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, गणेश देशमुख, संदीप साळापुरीकर, बाळासाहेब लांबाडे, रामा जावळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.