बीड दि.१२(प्रतिनिधी):- तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गोरक्षनाथ टेकडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवार (दि.१२) रोजी रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.याप्रसंगी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या सोहळ्यास आपली उपस्थित राहून, त्यांच्या आमदार विकास निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण केले.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे ह.भ.प.वै.किसन बाबा यांच्या २४ व्या पुण्यतिथी निमित्त मठाधिपती ह.भ.प. नवनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात दिवसांपासून  अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता.या प्रसंगाचे औचित्य साधून, गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या आमदार निधीतून उद्घाटन केलेली विविध विकास कामे पुर्णत्वास आणून शुक्रवार (दि.१२) सप्ताह सांगता सोहळ्यात आ.संदीप क्षीरसागर यांनी लोकार्पण केले.यात प्रामुख्याने भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यासाठी २५ लक्ष रूपयांच्या भव्य सभामंडपाची उभारणी करणे,जि.प‌. अंतर्गत रस्ता सुधारण्यासाठी २५ लक्ष रूपये, गोरक्षनाथ टेकडीवर विद्युत पोल व विद्युत रोषणाई करणे १५ लक्ष रूपये आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी,राजकारणा सोबत समाजकारण व भक्ती-शक्तीच्या सानिध्यात राहून समाजसेवा करण्याची शिकवण मला स्व.काकूंकडून मिळाली आहे.गोरक्षनाथ टेकडीच्या विकासासंबंधित ह.भ.प.नवनाथ महाराज तसेच भाविक भक्तांच्या ज्या काही सुचना व मागण्या असतील त्यांची पुर्तता करण्यासाठी सदैव असून सर्व धर्मिय साधु, संतांच्या तसेच ह.भ.प.नवनाथ महाराज यांच्या आशिर्वादाने गजानन सहकारी साखर कारखाना याच वर्षी सुरू करून ऊसाचे एक ना एक टिपरू कारखान्यावर घेऊन जाणार असे सांगितले.यावेळी तालुक्यासह जिल्हाभरातून आलेले भाविक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.