शिरुर दिनांक ( वार्ताहर ) - शिरुर शहरातील मध्यवर्ती भागातील कापड बाजार परिसरातील गोडीजी पार्श्वनाथ मंदिराच्या सुरक्षारक्षकास मारहाण करुन कटावणीचे मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातील दानपेटी टॉमीने फोडून त्यातील ३० हजार रुपये व सृरक्षा रक्षकाचा मोबाईल असा ३७ हजार रुपयेचा माल चोरट्यांनी चोरुन नेला . भर मध्यवस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराचे सुरक्षारक्षक पोपट सोनबा घनवट रा.वाडेगव्हाण ता.पारनेर जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली आहे . यासंदर्भात तीन अज्ञात चोरटेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दि.२० एप्रिल २०२४ रोजी रात्री १.३० वा ते २.०० वा चे दरम्यान अंदाजे वय २५ ते ३५ वर्ष वयोगटातील तीन अनोळखी व्यक्तीनी मंदिराचा आतील आवारात येवुन मंदिराचा मुख्य दरवाजाला असलेले लॉक व कुलुप कटावणीने तोडुन मंदीरात प्रवेश केला . मंदीरातील दानपेटी कटावणीने फोडुन त्यातील रोख रक्कम ३०,००० रू व सुरक्षारक्षक घनवट यांचा मोबाईल हा चोरून नेला आहे . घनवट हे मंदिरात खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी डयुटीसाठी आले होते. रात्री ११.३० वाजता मुख्य मंदीराचे व बाहेरील लोखंडी दरवाजा पुजारी यांनी बंद केले होते व घनवट हे बाहेरील लाकडी दरवाजा यास कुलुप लावुन मंदीराच्या आतील आवारात पहारा देत बसले होते . दि.२० एप्रिल रोजी रात्री ०१.३० वाजण्याचे सुमारास ०३ अनोळखी ईसम अचानक सुरक्षारक्षक घनवट यांच्या समोर आले व त्यांना खाली पाडुन छाती दाबुन धरून त्यातील एकाने हातात मोठा स्कु ड्रायव्हर धरून घनवट यांच्या डोक्यात मारला व त्याचे तोडांवर बोट धरून ईशा-याने घनवट यांना ओरडु नको म्हणुन न बोलता ईशारा करत होता.दोघेजण मंदीराकडे गेले मंदिराचे मुख्य दरवाजाला असलेले लॉक व कुलुप कटावणीने तोडले व मंदिराचा आत प्रवेश करून आतील बाजुस असलेली दानपेटी टॉमीने तोडुन त्यातील रोख रक्कम त्या दोन अनोळखी ईसमानी काळया सँग/ बॅग मध्ये भरून घेतली. त्यांनतर ते दोघेजण घनवट यांच्या जवळ आले व त्या ०३ अनोळखी ईसमानी त्यांचेकडील असलेले कापडाने घनवट यांचे हात पाय बांधले त्याच्याकडील मोबाईल बळजबरीने काढुन घेवून पाठीमागील दरवाजावाटे निघुन गेले.घनवट यांनी तोडांने बांधलेले कापडे सोडवुन रात्री ०२.०० वाजण्याचे सुमारास रमेश पुजारी यांना आवाज देवुन बोलावुन घेतले व त्यांना घडलेले घटनेबाबत माहीती दिली.. सर्व आरोपींनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. घटनेचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले . पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनीही घटनास्थळी भेट दिली . आधिक तपास पीएसआय एकनाथ पाटील करीत आहेत .दरम्यान या चोरीचा तपास एलसीबी व पोलीसांचे पथक करत असून घटनास्थळी श्वानपथकही आणण्यात आल्याची माहिती पोलीस उपविभागीय आधिकारी ढोले व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दिली .