कन्नड: दि. १८ एप्रिल.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कन्नड शहरात रामनवमी उत्साहाने साजरी करण्यात आली.
स्वराज्यरक्षक सेवा संघ कन्नडच्या वतीने एक भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली. या शोभायात्रेत सर्वसमावेशक नागरिकांनी सहभाग नोंदवला.
शोभायात्रेत विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथांवरचा राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचा बालांनी साकारलेला सजीव देखावा सगळ्यांचे मन वेधून घेत होता.
शोभायात्रेत सिंगर बॅन्ड , ढोल ताशे आणि भगवा ध्वज हवेत लहरत उत्साहाने नाचणारे हजारो तरुण यांच्या उत्साहाला सीमा नव्हती.
याचसोबत एकाच वेषातील भगवा झेंडाधारी कन्या पथकाने तालावर नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली.
मिरवणुकीदरम्यान जागोजागी नागरिक , सुवासिनी देखाव्यातील देवतांचे औक्षण करून, दर्शन घेऊन, पुष्पवृष्टी करून प्रसाद वाटून आपला भक्तिभाव प्रकट प्रकट करत होते. मध्ये मध्ये सेवाभावी नागरिकांनी मिरवणुकीतील उत्साही वर्गासाठी पिण्याचे पाणी, चहा आदि सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. पिशोर नाका येथे सचिन महाराज यांच्या समधुर वाणीतून हनुमान चालीसाचे सामुहीक पठण झाले. तर विवेकानंद कॉलनी ,पिशोर रोड येथील राममंदिरात भव्य आरतीने सांगता करण्यात आली.
या शोभा यात्रेत तेलवाडी आश्रमाचे सचिन महाराज. विजय गंगाराम चव्हाण संचालक अर्णव इंडस्ट्रीज अँड ग्रुप कंपनी तथा सरपंच हरसवाडी,आमदार उदय सिंग राजपूत, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते ,उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास विठ्ठल जाधव , उपाध्यक्ष डॉ संजय तेली , संघप्रमुख नितीन राठोड, संघसचिव श्रीकृष्ण बडग, संघ कार्यवाहक अमोल तागवाले, , कन्नड तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक शेखर मांडे, उद्योजक मनोज भाऊ पवार ,माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ कोल्हे, प्रा.डॉ संजय गव्हाणे, राजेंद्र गव्हाणे, सुनील पवार, रवी राठोड, प्रमोद ढोले , दीपक डोळस, अरुण मासरे , उमेश सातदिवे, आदित्य पाटील , जयेश देशमुख ,विश्वजीत केवट , निशांत चव्हाण, संदेश उदासी , गोरख राठोड, अजय खिल्लारे , गणेश राऊत, सचिन बेडवाल , विजय वाणी ,सुरेश मिथे , रेणुकादास कुलकर्णी, संजय पंडित अनिल शिरसाठ , सुदाम पवार, बंटी इंगळे ,उमेश राठोड , योगराज साबळे, आदी सह असंख्य रामभक्त सामील झाले होते.