स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हर घर तिरंगा... घर घर तिरंगा...

 दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे नावीन्यपूर्ण उपक्रम.

जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुरखेडा च्या वतीने राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण

कुरखेडा: 

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी दीं गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुरखेडा यांनी हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी उचललेले पाऊल हे कौतुकास्पद असून आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या माध्यमातुन अनेक सामाजिक उपक्रम राबवून सेवाभावी वृत्तीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे . 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुरखेडा च्या वतीने आदिवासीं विवीध सहकारी संस्थेचे पदाधिकारी, व ग्रामपंचायत पदाधिकारी व बँकेच्या खातेदारांना व गरजू नागरीकांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते तिरंगी राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार , जिल्हा सहकार बोर्डचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ्‍यंकटी नागीलवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माधवदास निरंकारी , भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,उपप्राचार्य पिसाराम खोपे, प्रा डॉ नरेंद्र आरेकर पाणीपुरवठा सभापती एडवोकेट उमेश वालदे, ज्येष्ठ नेते गणपत सोनकुसरे माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम नगरसेविका अलका गिरडकर उपस्थित होते.

१५ ऑगस्ट २०२२ ला भारत देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत , देशाचा अभिमान व अस्मिता कायम राखण्यासाठी तसेच देश प्रेमाची भावना जागृत ठेवण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येऊन संपूर्ण भारत देशात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवून प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालय, प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येत आहे सदर अभियानात प्रत्येक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हर घर तिरंगा अभियान यशस्वी करावे असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर खेमनाथ पाटिल डोंगरवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँक शाखा व्यवस्थापक उल्हास महाजन यांनी केले तर आभार बँक व्यवस्थापक कुरखेडा नाट यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.