शिरुर दिनांक ( वार्ताहर ) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते अविनाश शिंदे तसेच चेतन भाऊ साठे व मयूर भाऊ भोसले मित्र परिवार यांच्या वतीने इंदिरानगर , सिद्धार्थनगर व शांती नगर या परिसरातील नागरिकांना मिठाई चे वाटप करण्यात आले . या प्रसंगी राजापूरचे माजी सरपंच, संतोष शिंदे , युवा नेते साजिद भाई खान ,गोरख मामा ससाणे, युवा नेते सागर पंडित , फिरोज भाई ( तिरंगा बिर्याणी ) , कय्युम भाई शेख, विशाल भाऊ ससाणे , हर्ष गायकवाड, हर्षद कांबळे, सुमित बागवे, ओम अडगळे, रुपेश घाडगे, विशाल साबळे, आदित्य उबाळे आदी उपस्थित होते.