औरंगाबाद शैलेंद्र खैरमोडे : - ‘आझादी का अमृत महोत्सव’ विषयावर स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मिळ माहिती व छायाचित्रे यावर आधारित चित्र प्रदर्शन रेल्वे स्थानक परिसरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आयोजित केले आहे. 

 केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा माहिती कार्यालय , दक्षिण मध्य रेल्वे, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानकाच्या एक क्रमांक फ्लॅट क्रमांकाजवळील जुन्या गेटच्या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले व मोफत राहील. शालेय, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचेही प्रदर्शनासाठी सहकार्य लाभलेले आहे. शिव दर्शन सांस्कृतिक शाहिरी संचाच्या पोवाड्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रदर्शन ठिकाणी करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक कार्यालयांनी केले आहे.