शिरुर दिनांक ( वार्ताहर ) छत्रपती संभाजी महाराज शिक्षण संस्थेच्या सीताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयास नॅक कडून बी पल्स पल्स (CGPA 2.92 Grade B++) चे मानांकन मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ . द्वारकादास बाहेती यांनी दिली आहे . सिताबाई थिटे फार्मसी कॉलेजचे नॅक मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी नॅक समितीने नूकतीच भेट दिली. या भेटीमध्ये समितीने महाविद्यालयातील विविध शैक्षणिक विभागांना भेटी दिल्या. अभ्यासेतर विभाग आणि विविध उपक्रमांना विशेषतः एनएसएस, विद्यार्थी विकास मंडळ, परीक्षा विभाग, जिमखाना विभाग, ग्रंथालय, मीडिया सेंटर, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतीगृह, स्पर्धा परीक्षा केंद्र, यांना भेटी देऊन प्राध्यापकांशी चर्चा करून मूल्यमापन केले. महाविद्यालयाचे नाविन्य पुर्ण उपक्रम , क्रिडा विभाग, सांस्कृतिक विभाग इत्यादी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेले यश पाहून समितीने विशेष कौतक केले. प्लेसमेंट सेल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेला रोजगार, विविध योजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना झालेली भरीव मदत, महाविद्यालयाच्या सर्व इमारती व विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध सोयीसुविधा याबाबतीत समाधान समाधान व्यक्त करण्यात आले. संस्थेची ध्येय धोरणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती यांचे नेतृत्व तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या सादरीकरणाची समितीने प्रशंसा केली.आयक्यूएसी चे समन्वयक डॉ.मनोज तारे , यांनी सर्व प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख, नॅकच्या विविध समितीचे प्रमुख व सदस्य यांनी विशेष योगदान दिले . छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे , संस्थेचे सचिव धनंजय थिटे . तसेच संस्थेचे व महाविद्यालय नियामक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सन्माननीय सदस्य यांचे पाठबळ व मार्गदर्शन, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे परिश्रम, विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील यश, माजी विद्यार्थी व महाविद्यालयाशी जोडलेले सामाजिक व इतर क्षेत्रातील अनेक तज्ञ, परिसरातील औद्योगिक व सामाजिक संस्था या सर्वांच्या योगदानामुळे हे यश प्राप्त झाले आहे.शिरूर तालुक्यातील फार्मसी कॉलेज मध्ये नॅक ॲक्रीडेशन मिळालेले थिटे फार्मसी कॉलेज एकमेव आहे . फार्मसी कॉलेज मध्ये आलेल्या नॅक मूल्यमापन समितीचे चेअरमन डॉ. रमेश मुधोळ होते तर डॉ .एम डी धनराजू ,व डॉ उमा भंडारी सदस्य होते असे प्राचार्य डॉ द्वारकादास बाहेती यांनी सांगितले .a