शिरूर दिनांक (वार्ताहर) छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती शिरूर शहरात साजरी करण्यात आली.

  शहरात महायुतीचा वतीने पुणे नगर रस्त्यांवर हुतात्मा स्मारकाजवळ शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात, शहर संघटक सुरेश गाडेकर, मीना गवारे, सुमन साळवे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार, संतोष शितोळे, माजी नगरसेविका अंजली थोरात, रेश्मा लोखंडे, भाजपाच्या अनघा पाठक ,रेश्मा शेख,प्रिया बिरादार, माजी नगरसेवक विनोद भालेराव, जयवंत साळुंखे, नील शर्मा, सुजाता पाटील, रिता जाधव, कोमल भगवे, सना शेख,सुशीला गोसावी, सृष्टी करंजुले, शुभांगी पाचरणे , विजय नरके, निलेश नवले, गणेश गिरे, पूजा चौंधे, वैशाली ठुबे, यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रुतिका झांबरे, कल्पना चांदगुडे, रुपाली पवार, मनीषा गव्हाणे, राजश्री शेजवळ, मोनिका राठौड, सोनाली रायभोळे, दुर्गा नन्नवरे आदी सह विविध संस्था संघटना यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मयूर थोरात यावेळी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यास युवकांनी करावा. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.