शिरुर  : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे , म्हाडाचा विभागीय घटक प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरुर येथे घराची योजना वात्सल्य हॉस्पिटल शेजारी , गोलेगाव रोड शिरुर येथे होत असून या करीता ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली असून ८ एप्रिल २०२४ ही ऑनलाईन अर्ज नोंदण्याची अंतिम मुदत आहे . सर्व्हे नंबर ३०८ मध्ये ही योजना असून १ बीएचके ( इडब्लूएस ) सदनिकेची अंदाजित किमंत १७ लाख 22 हजार आहे . ( पीएमएवाय ) सदनिकेची अंदाजित किमंत १४ लाख ७२ हजार - १५ लाख १ हजार 600 रु . आहे . सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ ३९ . ७२५ चौ . मी व सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 26 . 49 - 30 . 65 चौ . मी आहे . वेबसाईट चा पत्ता : https : // lottery. mhada.gov.in WWW.mhada.gov.in असा आहे . ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख व वेळ ८ एप्रिल २०२४ ला सायंकाळी ५ पर्यत आहे .