सोमवारी मनोज पाटील जरांगे यांची कडेठाण येथे संवाद बैठक होणार
पाचोड( विजय चिडे) मराठा आरक्षणाचे रान पेटवत सकल मराठा समाजाला एकत्र करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी (दि.१८)कडेठाण ता.पैठण येथे संवाद बैठक होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी जरांगे राज्यभरात दौरे करत असून सोमवारी संध्याकाळी जरांगे पाटील यांची कडेठाण येथे मराठा समाजाची संवाद साधणार आहेत. तरी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान कडेठाण येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे