शिरुर दिनांक ( वार्ताहर )डेक्कन स्कूल शिरूर येथे विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . येथील डेक्कन स्कूल मध्ये विज्ञान दिनाच्या निमित्ताने डॉ ए. पी .जे .अब्दुल कलाम अंतर शालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, डेक्कन इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्याधाम प्रशाला, विजयमाला विद्यामंदिर, सैनिकी स्कूल निघोज आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले. स्पर्धेचे उद्घघाटन डेक्कन स्कूलच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुधाकर पोटे व गणेश मराठे , शाळेचे मुख्याध्यापक डॉ . समीर ओंकार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून विद्याधाम प्रशालेतील निवृत्त विज्ञान शिक्षक श्रीकृष्ण जोशी, बोरा महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्रा. किशोर थोपटे, निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयातील रसायशास्त्राच्या प्रा. सौ. वैशाली फंड यांनी परीक्षण केले. या स्पर्धेत बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल ने सादर केलेल्या प्रकल्पास प्रथम पारितोषिक, पोदार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय पारितोषिक, विद्याधाम प्रशाला तृतीय पारितोषिक तर विजयमाला विद्यामंदिर च्या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सांघिक विजेतेपदाचा चषक देवून बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेस गौरविण्यात आले. डेक्कन स्कूल मधील विज्ञान शिक्षक लवू धारजे व सोनाली लोखंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षिका मोनाली जाधव, जयश्री शिंदे, रत्नमाला महाजन यांनी विज्ञान संकल्पनेवर सुंदर रांगोळी रेखाटली. परिसरातील नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.