पाचोड हद्दीत अवैध डिझेल विक्री जोमात; विक्रेत्यांना अभय कोणाचे ?

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पाचोड (विजय चिडे) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा सतत वर्दळीचा असून या महामार्गावरती पैठण तालुक्यातील आडुळ पासून मुरमा फाटा पर्यंत २० पेक्षा अधिक हॉटेल आहे, त्यातील अनेक हॉटेलमध्ये रात्रींच्या वेळी सरासपणे अवैध डिझेलसह बायोडिझेलची विक्री होत आहे. याकडे महसूल व पोलिस विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्रास विक्री सुरू झाली आहे. वरकमाईमुळे कर्तव्यही खुंटीला टांगल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीचा विषय तालुक्यात चर्चेत असताना संबंधित अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैध डिझेल व बायोडिझेल विक्रीला नेमके अभय कोणाचे, असा प्रश्‍न सर्व सामान्यांना पडला आहे. या राष्ट्रीय माहार्गावरील अनेक हॉटेल चालक हे त्या ठिकाणी जेवणासाठी थांबणाऱ्या मोठ्या वाहनांचे डिझेल हे कमी दारामध्ये घेऊन त्याची जास्त दराने विक्री करत आहे. तसंच या परिसरात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून अनेकांनी पेट्रोल पंपाचा व्यवसाय सुरू केलेला आहे.

या पेट्रोल-डिझेलच्या विक्रीमुळे होणाऱ्या व्यवहारात शासनाला मोठ्या प्रमाणात कर मिळतो, पण राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध डिझेल व बायोडिझेल च्या विक्रीमुळे येथील पंपचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामागे अधिकाऱ्यांचे ‘अर्थकारण’ दडल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. स्थानिक महसुल व पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने या व्यावसायिकांना खुली सूट मिळाली आहे.तरी आता जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून पाचोड हद्दीमध्ये सुरू असलेले अवैध डिझेल व बायोडिझेल विक्री थांबवावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.