कर्जबाजारीपणा कंटाळून विषारी औषध प्राशन करून साठ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या,

"अंबड तालुक्यातील कोळी सिरसगाव येथील घटना" 

पाचोड/ दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्यात सततची नापिकी कापसाच्या उत्पन्नात झालेली घट यामुळे शेतीत कामे उपलब्ध राहिले नसल्याने हातबल झालेल्या आणि हातउसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवेंचनात असलेल्या एका साठ वर्षीय शेतकऱ्यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना कोळी सिरसगाव ता.अंबड येथे सोमवारी (ता.२६ ) रोजी दुपारी घडली असून न भास्कर नवनाथ गिरी(वय ६०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,अंबड तालुक्यातील कोळी सिरसगाव येथील भास्कर नवनाथ गिरी यांच्या घरी जेमतेम दीड एकर शेती आहे. त्यामुळे तो इतर ठिकाणी शेतमजुराचे काम करीत असे. सततची नापिकी व यंदा कापसाला न लागणारा भाव त्यातच उत्पन्न निम्याहून घटल्याने शेतातील सर्व नियोजन कोलमडले गेले. अशा बिकट परिस्थितीत त्याने खासगी सावकरांकडून हातउसने दोन रुपये कर्जे पण घेतले होते. डोक्यावर वाढते कर्ज कसे फेडायचे या विचाराने ते चिंताग्रस्त होऊन मानसिक दबावाखाली वावरत होतानी सोमवारी (दि,२६) रोजी घराजवळील शेतात जाऊन विषारी औषध प्राशन आत्महत्या करुन मृत्युला कवटाळून घेतले.भास्कर नवनाथ गिरी यांनी त्यांच्या शेतात विषारी औषध प्राशन केल्याचे त्याच्यां नातेवाइकांच्या लक्षांत आले असता त्यांनी भास्कर गिरी यांना तात्काळ खाजगी गाडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबर यांनी गिरी यासं तपासून मृत घोषित केले असून त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात्ताप दोन मुले,चार मुली,पत्नी,एक सुन,दोन नातवंडं असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेचे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो-

भास्कर नवनाथ गिरी

मयत