शिरुर दिनांक ( वार्ताहर ) कारेगाव येथे वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेची पोलीसांनी सुटका केली आहे .याप्रकरणी अर्जुन रामसमुझ वर्मा वय 24 वर्ष, सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. पुरेफेरी, सराया महेशा, तिलोई, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश. (2) मंगलसिंग संतोषसिंग गेहलोत वय 33 वर्ष, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि.पुणे, मुळ रा. शिवनी खदान, ता. जि. अकोला (3) बबलु दुखबंधु साह वय 40 वर्षे, सध्या रा. कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे. मुळ रा. तालचर, ता. जि. डेकालाल, उडीसा यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २६ फेबृवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्‌यावर कारवाईचा बडगा उचलला असुन त्यासाठी स्वतंत्र पथके तयार केलेली आहेत. त्या पथकातील आयपीएस दर्शन दुगड हे साध्या वेषामध्ये नगर पुणे हायवे रोडवरील हॉटेल, लॉजेस मध्ये चालणा-या अवैध धंद्‌यांबाबत माहिती काढत असतांना त्यांना कारेगावमधील एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याच माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार दर्शन दुगड यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या स्टाफला बोलावुन घेतले. तसेच त्यांच्यासोबतचे पथकातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिरुर येथील पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पो.हवा. विनायक मोहिते, परशुराम म्हस्के, दिनेश कुंभार व महिला पोलीस कॉ.आर.बी. टोपे यांचे दोन वेगवेगळे पथक तयार केले . बातमी मिळालेल्या ठिकाणाजवळ एक बनावट ग्राहक पाठविले. सदर ठिकाणी अवैध्यरित्या वेश्याव्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्यावर दुगड यांचे पथक व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे पथक असे दोन्ही पथकांनी सदर ठिकाणी छापा टाकला . छापा कारवाई मध्ये उडीसा राज्यातील एक 40 वर्षीय महिला मिळून आली असुन तिच्या असहाय्यतेच्या फायदा घेवुन तिस लैंगीक हेतु करीता अवैधरित्या देहविक्री करीत असताना आरोपी 1) अर्जुन रामसमुझ वर्मा वय 24 वर्ष, सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. पुरेफेरी, सराया महेशा, तिलोई, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश. (2) मंगलसिंग संतोषसिंग गेहलोत वय 33 वर्ष, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि.पुणे, मुळ रा. शिवनी खदान, ता. जि. अकोला (3) बबलु दुखबंधु साह वय 40 वर्षे, सध्या रा. कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे. मुळ रा. तालचर, ता. जि. डेकालाल, उडीसा, हे मिळुन आले . पोलीसांनी सदर आरोपीना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील रोख रक्कम, , मोबाईल व अन्य बाबी असा एकुण 31,410/रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला . आरोपीना अटक करण्यात आली असुन न्यायालयाने २६ फेबृवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक पकंज देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक पुणे रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली आयपीएस दर्शन दुगड , पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पो. हवा. विनायक मोहिते, परशुराम म्हस्के, दिनेश कुंभार व महिला पोलीस कॉ. आर. बी. टोपे, रांजणगाव पोलीस स्टेशन मधीक सहा. फौज, दत्तात्रय शिंदे, पो. हवा. विलास आंबेकर, माऊली शिंदे, वैजनाथ नागरगोजे, पो.कॉ. शुभम मुत्याळ यांनी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे करत आहेत. चौकट पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे म्हणाले की रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये तसेच औद्योगीक परिसरामध्ये कोणी अवैध धंदे करणारा व्यक्तींना जागा, घर भाड्याने देईल अशा जागा व घर मालकांना देखील गुन्हयामध्ये आरोपी करण्यात येईल. तसेच नागरीकांना कोणी माथाडी, प्लेसमेंटच्या नावाखाली पैशांची मागणी करुन फसवणुक, खंडणीची मागणी करत असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावे असे आवाहन केले आहे.