शिरुर ( वार्ताहर ) अपहरण करुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे . समिर उर्फ सोन्या मच्छिंद्र तिरखंडे, सागर मच्छिंद्र तिरखंडे दोन्ही रा. भांबार्डे, ता. शिरुर, जि.पुणे व रमाकांत सतीष जासुद रा. कर्डे, चव्हाणवाडी, ता. शिरुर, जि.पुणे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांना न्यायालयाने २२ फेबृवारी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे . यासंदर्भात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी सांगितले की रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक रोडवर १४ फेबृवारीला  दुपारी 1.30 वा. सुमारास भांबार्डे येथील समिर उर्फ सोन्या तिरखुंडे याने फिर्यादी अजित हणुमंत ढेरंगे याला बोलावुन घेवुन तु माझ्या बहिणीला त्रास का देतो असे म्हणुन त्याच्या साथीदारांचे मदतीने अजित ढेरंगे याला मारहाण करुन व पिस्तुलाचा धाक दाखवुन त्यांचेकडील लाल रंगाच्या गाडीतुन अपहरण करुन अष्टविनायक रोडने पोंदेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील फॉरेस्ट मध्ये घेवुन गेले. त्या ठिकाणी आरोपीनी अजित ढेरेंगेच्या डोक्यात, दोन्ही हातावर कोयत्याने वार करुन त्यास गंभीर जखमी केले . जखमी अजित हणुमंत ढेरंगे याच्यावरती मंचर येथील हॉस्पिटलमध्ये औषोधोपचार चालु आहेत. या प्रकरणी अजित हणुमंत ढेरंगे यांचे फिर्यादीवरुन 1) प्रविण वाळके रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे. 2) समिर उर्फ सोन्या मच्छिंद्र तिरखंडे 3) सागर मच्छिंद्र तिरखंडे दोन्ही रा. भांबार्डे, ता. शिरुर, जि. पुणे. 4) हर्षद गोसावी रा. शिरुर, बाबुरावनगर, 5) रमाकांत सतिष जासुद रा. कर्डे, चव्हाणवाडी, ता. शिरूर, जि. पुणे 6) सुजाता संजय भोंडवे रा. भांबार्डे, ता. शिरुर, जि. पुणे. यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना आरोपीच्या शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक वाघमोड यांनी दोन स्वतंत्र तपास पथके आरोपींचे शोध कामी रवाना केली होती. तपास पथकाने नारायणगाव, मंचर, जुन्नर, अहमदनगर, केडगाव चौफुला इत्यादी ठिकाणी शोध घेवुन गुन्ह्यातील आरोपी 1) समिर उर्फ सोन्या मच्छिंद्र तिरखंडे, 2) सागर मच्छिंद्र तिरखंडे दोन्ही रा. भांबार्डे, ता. शिरुर, जि.पुणे य व 3) रमाकांत सतीष जासुद रा. कर्डे, चव्हाणवाडी, ता. शिरुर यांना अटक केली आहे. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक पकंज देशमुख . अप्पर पोलीस अधिक्षक पुणे रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पो.हवा. विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, पो.कॉ. उमेश कुतवळ, विजय शिंदे, पो.हवा. माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, माणिक काळकुटे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, करीत आहेत.