रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्स्प्रेसला जोडलेल्या पर्यटनपूरक व्हिस्टाडोम कोचला पर्यटकासह प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा होत आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या गाड्यांच्या व्हिस्टाडोम डब्यांमधून २१ कोटी ९५ लाखांचा महसूल मिळाला असून, त्यात कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधून सुमारे ११ कोटींचा महसूल मिळाला आहे. मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते लोकप्रिय होत आहेत. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रूंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरले आहेत. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मध्यरेल्वेच्या गाड्यांवर धावणाऱ्या व्हिस्टाडोम डब्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसमधून २६ हजार २६९ लोकांनी प्रवास केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेसचा २५ हजार ६४४ प्रवासी, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा २५ हजार ३० प्रवाशांनी लाभ घेतला. मुंबई-करमाळी २४ हजार ३१ प्रवासी तर मुंबई तेजस एक्स्प्रेस आणि पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेसमधील डब्यांचा २० हजार २७२ प्रवाशांनी लाभ घेतला. तेजसमधून ६ कोटी १८ लाख, जनशताब्दीमधून ५ कोटी १४ लाख, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दीमधून ४ कोटी १६ लाख, डेक्कन क्वीनमधून २ कोटी २९ लाख, मुंबई- पुणे एक्स्प्रेसमधून २ कोटी २० लाख तर डेक्कन एक्स्प्रेसमधून १ कोटी ९८ लाखाचा महसूल मिळाला. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्यरेल्वेवर सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ ऑक्टोबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये सुरू करण्यात आले. व्हिस्टाडोममधील सुविधा व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रूंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्ष्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लायडिंग कम्पार्टमेन्ट डोअर्स, दिव्यांगांसाठी रूंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरॅमिक टाईल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्ये आहेत. शेवटचा पण महत्त्वाचा भाग म्हणजे व्ह्युईंग गॅलरी आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
The Akshay Kumar and Tiger Shroff film Bade Miyan Chote Miyan will now have an Eid 2024 release date. - Newzdaddy
The movie is anticipated to be one of the year's biggest action blockbusters and the most...
ડીસા તાલુકા સહકારી ખરીદ વેચાણ સંઘમાં વહીવટદારની નિમણૂક કરાઈ
ડીસા તાલુકા સહકારી ખરીદ વેચાણ સંઘમાં વહીવટદારની નિમણૂક કરાઈ
e-FIR તથા સીટીઝન પોર્ટલ/એપ અને સોશ્યલ પોલીસીંગ અંતર્ગત માર્ગદર્શન
e-FIR તથા સીટીઝન પોર્ટલ/એપ અને સોશ્યલ પોલીસીંગ અંતર્ગત માર્ગદર્શન
આગામી સપ્તાહમાં રાજ્યભરમાં હળવાથી મઘ્યમ વરસાદની સંભાવના
આગામી સપ્તાહમાં રાજ્યભરમાં હળવાથી મધ્યમ વરસાદની સંભાવના
આગામી તા.19 જુલાઈ થી 21 જુલાઈ...